महेश बाबूचे अफेअर? पत्नीने रंगेहात पकडले

On: March 7, 2025 2:07 PM
Mahesh Babu Affair
---Advertisement---

Mahesh Babu Affair l दक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी त्याच्या चित्रपटांमुळे नव्हे, तर खासगी आयुष्यामुळे! एका निर्मात्याने दावा केला आहे की, महेश बाबूचा प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा हिच्यासोबत सिक्रेट अफेअर होते. एवढेच नाही, तर त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हिने हे संबंध रंगेहात पकडले, असेही सांगितले जात आहे.

“महेश बाबू आणि त्रिशाचे सिक्रेट प्रेमसंबंध!” :

निर्मात्या गीता कृष्णा यांनी एका मुलाखतीत महेश बाबूच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “महेश बाबू आणि त्रिशा गुपचूप मुंबईत भेटायचे. मात्र, एका दिवसात हे प्रकरण त्याच्या पत्नीपर्यंत पोहोचले.”

गीता कृष्णा पुढे म्हणाल्या, “नम्रता शिरोडकरला हे समजल्यानंतर तिने खूप हुशारीने हे प्रकरण हाताळले आणि त्यावर तोडगा काढला. ‘आगीशिवाय धूर येत नाही,’ असे म्हटले जाते, त्यामुळे यात काहीतरी तथ्य असू शकते.”

या वक्तव्यानंतर महेश बाबू आणि त्रिशाच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर मिळाला आहे.

Mahesh Babu Affair l महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांचे नाते :

महेश बाबू आणि नम्रता शिरोडकर यांची पहिली भेट ‘वंशी’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांच्या संमतीने लग्न केले. त्यांच्या लग्नाने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.

दरम्यान, महेश बाबू लवकरच दिग्दर्शक एस. एस. राजमौली यांच्या SSMB 29 चित्रपटात झळकणार आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा असणार आहे, ज्याची कथा राजामौली यांचे वडील विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही महेश बाबूसोबत दिसणार आहे.

News Title: Mahesh Babu’s Alleged Affair with Actress Trisha? Wife Namrata Caught Him Red-Handed!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now