महाशिवरात्री 2025: महादेवाची पूजा करताना ‘या मंत्रांचा करा जप

On: February 10, 2025 1:52 PM
Mahashivratri 2025 Puja Vidhi Shubh Muhurat and Mantras
---Advertisement---

Mahashivratri 2025 | महाशिवरात्रीला (Mahashivratri 2025 ) अवघे काही दिवस उरले आहेत. भगवान शंकराचे (Lord Shiva) भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. महाशिवरात्रीला महादेव (Mahadev) आणि माता पार्वतीची (Mata Parvati) मनोभावे पूजा केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीला काशी (Kashi) आणि देशभरातील विविध ठिकाणी शिव-पार्वतीची पालखी काढण्यात येते.

महाशिवरात्रीला पूजा आणि व्रताचे महत्त्व:

महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते, तसेच वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा टिकून राहतो, असे मानले जाते. महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो आणि वैवाहिक आयुष्यात सुख नांदते, अशी मान्यता आहे.

महाशिवरात्री 2025: शुभ मुहूर्त

फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी प्रारंभ: 26 फेब्रुवारी, सकाळी 11:08
फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी समाप्ती: 27 फेब्रुवारी, सकाळी 08:54
व्रत समाप्ती (पारण): 27 फेब्रुवारी, सकाळी 06:59 ते 08:54 (Mahashivratri 2025)

महादेवाच्या पूजेसाठी मंत्र:

महादेवाची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करणे लाभदायक ठरते

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्। सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि।।
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
ॐ महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नः शिवः प्रचोदयात्॥
ॐ पार्वतीपतये नमः
ॐ नमः शिवाय

Title : Mahashivratri 2025 Puja Vidhi Shubh Muhurat and Mantras

 

Join WhatsApp Group

Join Now