राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा

On: November 6, 2024 11:15 AM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather l दिवाळीचा सण पार पडला असूनही राज्यात अजूनही हवामानात बदल झाला नाही. कारण राज्यातील थंडीचे प्रमाण कमी असल्याचं दिसत आहे. तसेच राज्यातून परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आज देखील राज्यात अवकाळी पावसाचा जोर काही ठिकाणी कायम आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यातील काही तापमानात वाढ :

राज्यातील काही भागात अजूनही उकाडा जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यातील तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद जळगाव ही जिल्ह्यात शहरात आहे. कारण मंगळवारी रात्री महाबळेश्वरमधील रात्रीचे तापमान हे 16.4 अंश होते.

तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य व पूर्व भारतात कालपासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाश देखील पाहायला मिळणार आहे.

Maharashtra Weather l राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार :

याशिवाय राज्यात थंडीची देखील चाहूल लागली आहे. मात्र काही भागात अद्यापही पावसाचे सावट कायम राहणार आहे. अशातच आता नोव्हेंबर महिन्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आता राज्याच्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळणार आहे तर अनेक भागात विजांचा कडकडाट होणार आहे.

अवकाळी पावसाच्या संकटामुळे राज्यातील नागरिकांनी अतिदक्षता घ्यावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले होते.

News Title : Maharashtra Weather Updates

महत्त्वाच्या बातम्या-

राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?

भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, ‘या’ नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”

लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

स्वामींच्या कृपेने आज कुणाची मनोकामना पूर्ण होणार?, वाचा राशीभविष्य

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now