Maharashtra Weather Update | राज्यातील विदर्भात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. भंडारा, गोंदिया जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Maharashtra Weather Update )
तर पुढील 24 तासांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काही अंशी ओसरणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात आज (बुधवार) पर्यंतच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. 27 सप्टेंबरपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आता ओसरू लागल्यामुळे राज्यातही पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे. मात्र, गुजरातच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. (Maharashtra Weather Update )
आयएमडीने आज 11 सप्टेंबररोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मध्य महाराष्ट्र, नाशिक, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर कोल्हापूर, अमरावती, नागपूर येथेही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा
नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Update )
महाराष्ट्रात पावसाने उघडीप घेतल्याने सध्या अनेक ठिकाणी उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. काल 10 सप्टेंबररोजी नागपूर आणि जेऊर येथे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सध्या कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण महाराष्ट्रात दिसून येतंय. त्यातच हवामान विभागाने उद्यापासून पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
News Title – Maharashtra Weather Update September 11
महत्वाच्या बातम्या-
पुणे शहरातील ‘हे’ प्रमुख रस्ते आजपासून बंद राहणार; ‘या’ पर्यायी मार्गांचा करा वापर
पुढील 2 महीने ‘या’ 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा!
लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार थेट 4500 रुपये?, ‘या’ दिवशी येणार पैसे?
“भारताला हिंदू राष्ट्र कायम ठेवायचं असेल तर, मोदींनी देशाचं नेतृत्व योगींकडे द्यावं”






