Maharashtra Weather | यंदा मान्सून लवकर धडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. तसेच हवामान अभ्यासकांनी देखील मान्सून लवकर दाखल होईल असं सांगितलं आहे. मात्र राज्यातील ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यात उष्णतेनं नको नको केलं आहे. याचा पालघर, ठाणे आणि मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. उष्णतेनं अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. यामुळे आता हवामान अभ्यासकांनी उष्णतेपासून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. (Maharashtra Weather)
हवामान विभागाने मुंबई, पालघर आणि ठाणे येथे येत्या दोन दिवसांमध्ये हवामान उष्णच राहणार असल्याचं सांगितलं आहे. सध्या पावसाळा जवळ येत मुंबईतील हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाच्या धारा लागल्या आहेत. या उष्णतेच्या वातावरणाने जीवाची घालमेल होताना दिसत आहे.
तापमानाचा पारा वाढला
गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा हा वाढताना दिसत आहे. आजच्या दिवशीही मुंबईमध्ये तापमानाचा ताप अनुभवायला मिळणार आहे. जे कर्मचारी, तसेच प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना एसीचा फायदा घेता येतो. मात्र कामाचे तास संपल्यानंतर त्यांना पुन्हा या उष्णतेशी सामना करावा लागत आहे. आजचं तापमान हे 36 अंशापर्यंत राहिल आणि तर आर्द्रता ही 70 टक्क्यांहून जास्त आहे. डॉक्टरांनी अधिक पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.
उष्णतेचा फटका
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने उष्णतेचा इशारा दिला आहे. मुंबईसह इतर उपनगरात हवामान हे दमट राहिल. जळगाव, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांना उष्णतेचा लाटेचा फटका बसणार आहे. (Maharashtra Weather)
दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सातारा, पुणे, रत्नागिरी, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतो. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण (Maharashtra Weather) दिसत आहे.
मुंबईमध्ये कालच्या दिवसात 4 हजाराहून अधिक मेगावॅट वीज खर्च होताना दिसत आहे. पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करण्यात आला आहे. वीज उत्पादक कंपन्यांपुढेही मोठं आव्हान तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.
News Title – Maharashtra Weather Update About Heatwaves And Yellow Alert
महत्त्वाच्या बातम्या
आरसीबीने दिनेश कार्तिकला दिला खास निरोप; भावुक व्हिडिओ व्हायरल
काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला! ‘या’ आमदाराचे निधन
पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठं वळण; कोर्टाने दिला मोठा निर्णय
या राशीच्या व्यक्तींनी वादाचे प्रसंग टाळावेत अन्यथा होईल मोठं नुकसान
“पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार विजयी होणार ही काळ्या दगडावरील पांढरी रेष”






