मोठी बातमी! राज्यात पुढील 48 तास अतिवृष्टीचा इशारा; हायअलर्ट जारी

Maharashtra Weather Update | राज्यभरातील अनेक भागात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईसह पुण्याला चांगलंच झोडपलं आहे. कोसळत्या सरीमुळे बऱ्याच ठिकाणी परिसर जलमय झाल्याचं चित्र दिसून आलं.

पुण्यात तर पावसाने नागरिक हैराण झाले. पुण्यात अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर काही ठिकाणी नागरिकांच्या दुकानांतील सामानाचेही नुकसान झालं आहे. अशात हवामान विभागाने हवामानाबद्दल महत्वाची अपडेट दिली आहे.

‘या’ ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट

पुढील 48 तास राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट तर विदर्भाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे मॉन्सून मुंबईत दाखल झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. मुंबईतही मुसळधार पाऊस पडणार असल्याने येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि ठाणेसाठी 11 जूनपर्यंत विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना (Maharashtra Weather Update ) विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.

मुंबईसाठी यलो अलर्ट

याशिवाय पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम , यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काल 8 जूनरोजी (Maharashtra Weather Update ) मालवण (110 मिलीमीटर पाऊस), पालघर (90 मिलीमीटर पाऊस), भिवंडी (60 मिलीमीटर पाऊस), कुडाळ (50 मिलीमीटर पाऊस) तर, मध्य महाराष्ट्रामध्ये सांगली, सुरगाणा, इगतपुरी येथे प्रत्येकी 50 मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय, गगनबावडा, अटपाटी, तासगाव, कवडेमहांकाळ, हर्सूल, शिराळा, राहुरी, भडगाव, संख, सातारा आणि सोलापूर येथे काल 20 मिलीमीटर पाऊस झाला.

News Title-  Maharashtra Weather Update 9 June

महत्वाच्या बातम्या-

“जो मराठा समाजाला त्रास देणार त्याला विधानसभेत…”, मनोज जरांगेंची तोफ कडाडली

“पुणेकरांना समुद्र नसल्याची खंत होती, म्हणून भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला”

शिंदेंच्या ‘या’ खासदाराला आला मंत्रिपदासाठी फोन, अजित पवारांचा गट अजून वेटिंगवर

मंत्रिपदाची हंडी फुटली!, महाराष्ट्रातील ‘या’ 5 नेत्यांना मंत्रिपदासाठी आले फोन

‘या’ राशीच्या व्यक्तींचं आज भाग्य उजळणार, नव्या संधी आयुष्य बदलतील