पुढील 48 तासांत ‘या’ भागांना अवकाळी झोडपणार; हायअलर्ट जारी

Maharashtra Weather Update | राज्यातील बऱ्याच ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. काही ठिकाणी तर, अवकाळी पाऊस पडून गेलाय. आता पुढील 48 तासांत पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे कोकण, मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता दिली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे.

‘या’ भागांना पावसाचा हायअलर्ट

पुढील 48 तासात मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीने या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, जळगाव, धुळे, कोल्हापूर, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण असून मान्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल, असं म्हटलं जातंय. पुणे आणि (Maharashtra Weather Update ) अहमदनगर येथेही काही भागांमध्ये सध्या पाऊस सुरू असल्याचं चित्र आहे. पुण्यात काही ठिकाणी येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

पुण्यात कसं राहील तापमान?

पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून त्यानंतर 10 तारखेपासून त्याची तीव्रता वाढून मुसळधार सरी कोसळतील. पुण्यात सध्या तरी ढगाळ वातावरणच राहील.

हवामान विभागाने दिलेल्या (Maharashtra Weather Update ) माहितीनुसार, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्हयामध्ये 50 ते 60 किमी प्रति वेगाने वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल. त्यामुळे या भागांना आता हायअलर्ट देण्यात आला आहे.

News Title – Maharashtra Weather Update 7 June

महत्त्वाच्या बातम्या-

‘मोदींनी गेले तीन महिने आराम केला नाही, त्यामुळेच…’; चंद्राबाबूंचं मोठं वक्तव्य

नितीश कुमारांनी धरले नरेंद्र मोदींचे पाय, पाहा व्हिडीओ

चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ