येत्या काही तासांत ‘या’ जिल्ह्यांत दमदार पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी

On: August 19, 2024 11:54 AM
Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | काल 18 ऑगस्टरोजी राज्यातील बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. पुण्याला तर पुन्हा एकदा पावसाने झोडपून काढले. पुण्यात ढगफूटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच फजिती झाली. आज 19 ऑगस्टरोजी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाने आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

याचबरोबर खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

तसेच, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड येथे मुसळधार पाऊस होईल.(Maharashtra Weather Update)

पुढील चार ते पाच दिवस जोरदार बरसणार

विदर्भाला देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)

मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवस तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

News Title-  Maharashtra Weather Update 19 august 2024

महत्त्वाच्या बातम्या –

कंगना रनौतचं महिलांबद्दल खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “अशा मुली पुरुषांना..”

“एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण, फडणवीस अर्जुन तर शरद पवार शकुनी मामा”

सुप्रिया सुळेंनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण; अजितदादा नव्हे तर ‘या’ नेत्याला बांधली राखी

आज लाडक्या भावाला राखी नेमकी कधी बांधावी?, जाणून घ्या शुभ मुहूर्त

आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार!

Join WhatsApp Group

Join Now