हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ सुरूच राहणार

On: January 2, 2026 12:35 PM
Maharashtra Weather Update
---Advertisement---

Maharashtra Weather Update | नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या हवामानात बदल जाणवू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात जाणवत असलेली कडाक्याची थंडी आता हळूहळू कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज, शुक्रवार २ जानेवारी रोजी किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता असून गारठा काहीसा कमी होऊ शकतो. मात्र, तापमानातील चढ-उतार कायम राहणार असल्याने पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी अजूनही जाणवणार आहे. (Maharashtra Weather Update)

राज्यात अनेक भागांत अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी थंडीची तीव्रता कमी झाली असली, तरी ग्रामीण भागात गारठ्याचा परिणाम अद्याप जाणवत आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत असून दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे.

ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ :

सध्या राज्यावर ढगाळ हवामानाचा प्रभाव दिसून येत असून त्यामुळे किमान तापमानात हळूहळू वाढ होत आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात जोरदार पावसाने हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. (Cold Wave)

गुरुवारी, १ जानेवारी रोजी देशभरात तापमानातील मोठी तफावत पाहायला मिळाली. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी किमान तापमान ३ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. याच कालावधीत केरळमधील पूनलूर येथे २४ तासांत देशातील उच्चांकी ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Maharashtra Weather Update | राज्यात गारठा कायम, शेतीवर परिणाम :

महाराष्ट्रातही तापमानातील तफावत स्पष्टपणे दिसून आली आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. दुसरीकडे, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया, परभणी, निफाड (Nifad), जळगाव, अहिल्यानगर (Ahilyanagar), जेऊर आणि भंडारा (Bhandara) या भागांतही तापमान १० अंशांच्या आसपास किंवा त्याखाली नोंदले गेले आहे. (Maharashtra Weather Update)

आज राज्यात किमान तापमानात आणखी थोडी वाढ होण्याची शक्यता असून गारठा काहीसा कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, पहाटे धुके आणि दव पडण्याची शक्यता कायम असून ग्रामीण भागात या थंडीचा शेतीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी हवामानातील बदलांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

News Title: Maharashtra Weather Today: Cold Likely to Ease Slightly, Fluctuations in Minimum Temperature Continue

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now