शाहरुख खान आयपीएलमधून किती रुपये कमावतो; मोठा खुलासा समोर

On: January 2, 2026 12:03 PM
Shahrukh Khan
---Advertisement---

Shahrukh Khan | आयपीएलमधील ‘कोलकाता नाइट रायडर्स’ (KKR) टीममुळे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. केकेआर संघात बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला सामील करून घेतल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, उत्तर प्रदेशचे भाजप नेते संगीत सोम यांनी शाहरुख खानवर जोरदार टीका केली आहे. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शाहरुख खान आयपीएलमधून नेमकी किती कमाई करतो, याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. (Shahrukh Khan Net Worth)

‘कोलकाता नाइट रायडर्स’ ही फ्रँचायझी शाहरुख खान, अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता यांच्या मालकीची आहे. २०२४ मध्ये केकेआरने आयपीएलचा सिझन जिंकत मोठं यश मिळवलं होतं. या यशामुळे केवळ लोकप्रियतेतच नव्हे, तर शाहरुख खानच्या संपत्तीतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

KKR टीममधून शाहरुख खानची वार्षिक कमाई किती? :

मिळालेल्या माहितीनुसार, शाहरुख खानची केकेआर टीम आयपीएलमधून दरवर्षी सुमारे २५० ते २७० कोटी रुपयांची कमाई करते. या कमाईतून शाहरुख खान संघावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च करतो. संघ खरेदी, खेळाडूंचे मानधन, व्यवस्थापन, प्रवास आणि इतर खर्च यासाठी ही रक्कम वापरली जाते.

सर्व खर्च वजा केल्यानंतर शाहरुख खानकडे सुमारे १५० ते १७० कोटी रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम शाहरुख खान आणि त्याच्या पार्टनर्समध्ये वाटली जाते. याशिवाय बीसीसीआयकडून मिळणारी टीव्ही टेलिकास्टची कमाई, स्पॉन्सरशिप, ब्रँड एंडोर्समेंट, मॅच फीज, फ्रँचायझी फीज आणि बक्षिसाची रक्कम यातूनही शाहरुखची मोठ्या प्रमाणात कमाई होते. (Kolkata Knight Riders Owner)

Shahrukh Khan | संपत्तीत मोठी वाढ, मात्र वाद अधिक गडद :

केकेआर (KKR) टीममुळे शाहरुख खानच्या एकूण संपत्तीत उल्लेखनीय वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. ‘हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२५’नुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती १२ हजार ४९० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या संपत्तीतील मोठा वाटा आयपीएलमधील केकेआर टीमकडून येतो. केकेआर फ्रँचायझीमध्ये शाहरुख खानचा ५५ टक्के हिस्सा असून, उर्वरित ४५ टक्के हिस्सा जुही चावला आणि जय मेहता यांच्याकडे आहे. (Shahrukh Khan IPL)

दरम्यान, केकेआर संघात बांगलादेशी खेळाडूचा समावेश केल्यामुळे शाहरुख खानवर सध्या जोरदार टीका होत आहे. बांगलादेशातील परिस्थितीचा संदर्भ देत काही राजकीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून, या मुद्द्यावरून आयपीएलसह बॉलिवूडमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, या सर्व वादांपलीकडे केकेआर टीम शाहरुख खानसाठी आजही एक अत्यंत फायदेशीर गुंतवणूक ठरत असल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

News Title: How Much Does Shah Rukh Khan Earn from KKR in IPL? Massive Income Revealed Amid Controversy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now