Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या मध्यावरच हवामानात अनपेक्षित बदल दिसून येत आहेत. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका कायम असताना दुसरीकडे उष्णतेत वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील नागरिक आणि शेतकरी दोघांनाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामानातील ही अस्थिरता काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
पाऊस, वादळ आणि गारपीटीची शक्यता :
भारतीय हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अंदाजानुसार सध्या वेस्टर्न डिस्टरबन्स (Western Disturbance) आणि चक्रीवादळी प्रणाली (Cyclonic Circulation) यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठे चढ-उतार निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि गारपीटीसह पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीमुळे वातावरण अस्थिर झाले असून काही भागांत अचानक पावसाच्या सरी पडत आहेत. (Maharashtra Weather Alert)
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. आता या प्रणालीचा प्रभाव हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 21 मार्चपासून परिस्थितीत काही प्रमाणात बदल दिसू लागला असून 24 मार्चपर्यंत राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर वातावरण पुन्हा कोरडे होण्याची आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Maharashtra Weather Alert | राज्यातील विभागनिहाय हवामान स्थिती :
कोकण पट्ट्यातील मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg) आणि पालघर (Palghar) या जिल्ह्यांमध्ये आता पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. या भागात आज हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असून तापमान 30 ते 34 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील वातावरण पुन्हा उन्हाळ्याकडे झुकताना दिसत आहे.
मध्य महाराष्ट्रातील पुणे (Pune), सातारा (Satara) आणि अहिल्यानगर येथे अवकाळी पावसाचा प्रभाव कमी झाला असला तरी सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur) आणि सोलापूर (Solapur) जिल्ह्यांमध्ये अजूनही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यांमध्ये तापमानात वाढ होऊन उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल असा अंदाज आहे.
दरम्यान मराठवाड्यातील लातूर (Latur) आणि धाराशिव (Dharashiv) येथे अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचा आणि गारपीटीचा धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील नागपूर (Nagpur), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), गोंदिया (Gondia) आणि भंडारा (Bhandara) या जिल्ह्यांमध्येही हवामानाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असून गारपीट आणि वादळामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट :
हवामान खात्याने काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
तसेच शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला देण्यात आला आहे. पुढील काही दिवसांत पावसाचा प्रभाव कमी होऊन पुन्हा उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले आहे.






