पालकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार!

On: April 30, 2025 7:07 PM
School
---Advertisement---

School Reopen | नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाची तारीख राज्य शिक्षण विभागाने (State Education Department) निश्चित केली असून, पुणे विभागातील (Pune division) शाळांसाठी १६ जूनपासून नियमित कामकाज सुरू होईल. या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमधील वेळापत्रकाबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. २०२५-२६ या सत्रासाठी हा निर्णय लागू राहील.

सुट्ट्या आणि शाळा सुरू होण्याचे वेळापत्रक-

विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी सुट्टीचा (School Reopen) कालावधी २ मे पासून सुरू होऊन १४ जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर, सोमवार, १६ जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होईल. तथापि, विदर्भ (Vidarbha) विभागातील शाळांसाठी वेळापत्रकात थोडा बदल आहे; तेथे २३ जून ते २८ जून या काळात शाळा केवळ सकाळच्या सत्रात भरतील.

विदर्भ विभागातील शाळांचे पूर्णवेळ नियमित कामकाज ३० जूनपासून सुरू करण्यात येईल. संपूर्ण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये किमान २३५ दिवसांचे कामकाज होणे बंधनकारक असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे, याची नोंद सर्व शाळांना घ्यावी लागेल.

शालेय कामकाजाचे नियम आणि सुट्ट्यांचे नियोजन-

राज्य शिक्षण (School Reopen)  विभागाने जाहीर केलेले हे वेळापत्रक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व शाळांना लागू आहे. यामध्ये शासकीय, जिल्हा परिषद (Zilla Parishad), महानगरपालिका (Municipal Corporation), नगर परिषद (Municipal Council) संचालित शाळांसह सर्व अनुदानित व विनाअनुदानित शाळांचाही समावेश होतो.

स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार सुट्ट्या घेण्याची मुभा शाळांना देण्यात आली आहे, परंतु यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) (Education Officer (Secondary/Primary)) यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य असेल. तथापि, कोणत्याही परिस्थितीत एकूण अनिवार्य कामाचे दिवस २३५ पेक्षा कमी होणार नाहीत, याची दक्षता शाळा प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.

News Title – Maharashtra Schools Reopen June 16th

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now