नागरिकांनो सावधान! 20 जुलै पर्यंत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

On: July 16, 2026 4:42 PM
Maharashtra Rain Alert
---Advertisement---

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्र राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, 17 जुलै ते 20 जुलैदरम्यान अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने (India Meteorological Department) व्यक्त केली आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे आणि काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला असून, अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

17 जुलैला अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 17 जुलै रोजी राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. कोकण (Konkan) विभागात बहुतांश ठिकाणी पाऊस पडू शकतो. मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि विदर्भ (Vidarbha) येथे काही भागांत, तर मराठवाडा (Marathwada) विभागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.

सातारा (Satara), सोलापूर (Solapur), नांदेड (Nanded), लातूर (Latur), धाराशिव (Dharashiv), भंडारा (Bhandara), चंद्रपूर (Chandrapur), गडचिरोली (Gadchiroli), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur), वर्धा (Wardha), वाशिम (Washim) आणि यवतमाळ (Yavatmal) या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert | 18 ते 20 जुलैदरम्यान असा असेल पावसाचा अंदाज :

18 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो, तर मराठवाड्यात काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाबरोबरच तुरळक भागांत जोरदार सरी कोसळू शकतात.

19 जुलै रोजी कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. विदर्भात काही भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 20 जुलै रोजी कोकणात बहुतांश भागांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.

News Title: Maharashtra Rain Alert Till July 20

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now