मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics | लोकसभा निकाल लागल्यानंतर देशासह राज्यातही मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिंदे गटातील बऱ्याच नेत्यांनी आता पराभवामागील कारण शोधत दोष देण्यास सुरुवात केली आहे. कालच शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी मोठा खुलासा केला होता. एकनाथ शिंदे यांच्यावर तिकीट बाबत दबाव असल्याचं त्या म्हणाल्या.

यानंतर ठाकरे गटाकडून आता काही नाराज नेते परतीच्या वाटेवर असल्याचे दावे केले जात आहेत. निकालादरम्यान, एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याचा दावा एका बड्या नेत्याने केला आहे.

मुंबईतील भाजपचे ‘ते’ आमदारही अस्वस्थ

लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे गटातील अनेक आमदार अस्वस्थ आहेत. हा आकडा आता 40 देखील असू शकतो, असं ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी भाजपबाबतही मोठा दावा केलाय.

भाजपचेही आमदार लोकसभा निकालांनी अस्वस्थ झाले आहेत. मुंबईतील भाजपचे 6 आमदार मागे पडले आहेत, त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत स्वत:चं अस्तित्व टिकवण्याचा विचार करावा लागेल.त्यात यातील काही आमदार हे भाजपचे नव्हतेच. त्यामुळे हे आमदारही भविष्यात भाजपसोबत राहण्याबाबत विचार (Maharashtra Politics )करतील,असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

ठाकरे गटाच्या या दाव्यामुळे आता भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदाराबाबतही मोठं भाष्य केलंय. शिंदेंच्या मतदारसंघात आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी शिंदे गटातील काही आमदारांनी ठाकरे गटातील आमदारांशी संपर्क साधला होता.असं सचिन आहिर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिवसेना पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कठोर भूमिका घेतली नाही, अशा नेत्यांनाच ठाकरे गटात (Maharashtra Politics ) प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आहे. सध्या राजकीय वर्तुळात सचिन अहिर यांच्या विधानाचीच चर्चा होऊ लागली आहे.

News Title – Maharashtra Politics Sachin Ahir big claim

महत्त्वाच्या बातम्या-

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’

शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”

ठरलं! 9 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची घेणार शपथ

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! RBI ने घेतला मोठा निर्णय