महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? हवामान खात्याने वर्तवला अंदाज

On: May 28, 2024 11:16 AM
Monsoon Update
---Advertisement---

Monsoon Update l सध्या बदलत्या वातावरणामुळे हवामानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला होता. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे राज्यात पाऊस कधी हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हवामान विभागाने वर्तवला महत्वपूर्ण अंदाज :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून केरळमध्ये कधी हजेरी लावणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. अशातच आता केरळमध्ये मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे मान्सून कोमोरिन, बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे, मालदीव आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात 19 मेपर्यंत दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे.

मात्र यंदाच्या वर्षी देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यानंदाच्या वर्षी महाराष्ट्रात पाऊस १०६ टक्के अधिक असणार आहे. तसेच येत्या दोन, तीन दिवसानानंतर म्हणजेच जून महिन्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या तुलनेत कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पाऊस जास्त पडणार असल्याचा अंदाज आहे.

Monsoon Update l मुंबईमध्ये मान्सून कधी दाखल होणार? :

जून महिन्यामध्ये एल-निनो निष्क्रिय अवस्थेत जाणार आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर या काळात ला-निना स्थिती सक्रिय होणार आहे. या सगळ्याचा थेट परिणाम जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या टप्प्यापेक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर या मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

याशिवाय महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 10 ते 12 जूनला मुंबईमध्ये पावसाचं आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील कित्येक जिल्ह्यांत हजेरी देखील लावली आहे.

News Title – Maharashtra Monsoon Update

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात घडली थरारक घटना; प्रियकराने संतापाच्या भरात कार अंगावर घातली अन् पुढं घडलं भयंकर

पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपाला दिला सर्वात मोठा धक्का

‘या’ तीन राशींच्या कुंडलीत होणार मोठे बदल

अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश?, छगन भुजबळांची संतापजनक प्रतिक्रिया; म्हणाले..

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now