राज्य सरकारचा मेगाप्लॅन! राज्यातील ‘हा’ भाग थेट समुद्राशी जोडणार

On: November 19, 2025 11:23 AM
Nashik ring road
---Advertisement---

Maharashtra Mega Road Project | महाराष्ट्रातील विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई–नागपूर (Mumbai- Nagpur) प्रवासाचा कालावधी 16 तासांवरून 8 तासांवर आला आहे. हा आधुनिक प्रवेश-नियंत्रित महामार्ग या वर्षीच पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आला असून, प्रवाशांना आणि वाहतूक क्षेत्राला याचा जबरदस्त फायदा होत आहे. आता या महामार्गाला आणखी कार्यक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावर ऐतिहासिक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नवीन निर्णयानुसार समृद्धी महामार्गाला थेट अरबी समुद्राशी जोडण्यात येणार असून, यामुळे विदर्भ प्रदेशाला प्रथमच समुद्रापर्यंत थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हा भाग आतापर्यंत समुद्रापासून दूर असल्यामुळे अनेक औद्योगिक आणि वाहतूक अडचणी जाणवत होत्या. मात्र, राज्य सरकारच्या या मेगाप्लॅनमुळे आता या अडथळ्यांना मोठा विराम मिळणार आहे.

इगतपुरी–चारोटी महामार्गामुळे वाढवन बंदराशी थेट जोडणी :

राज्य सरकारने विदर्भ विभागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. इगतपुरी ते चारोटी असा सुमारे 90 किलोमीटरचा नवीन महामार्ग उभारून समृद्धी महामार्गाला थेट वाढवन (Vadhavan) या जगप्रसिद्ध बंदराशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे तयार होणारे वाढवन बंदर हे जगातील पहिल्या 15 प्रमुख बंदरांत गणले जाणार असून, त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जोडणी निर्णायक ठरणार आहे. (Maharashtra Mega Road Project)

या प्रकल्पाची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी एक्स-सीओ लॉजिस्टिक्स पार्कच्या भूमिपूजनावेळी केली. या जोडणीमुळे विदर्भातील औद्योगिक उत्पादने, कृषी माल आणि निर्यातयोग्य वस्तू समुद्रमार्गे थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहेत. यामुळे वाहतूक खर्च, वेळ आणि ऊर्जा यांची मोठ्या प्रमाणात बचत होईल.

Maharashtra Mega Road Project | 8 तासांचा प्रवास यापेक्षाही वेगवान होणार :

समृद्धी महामार्गामुळे सध्या मुंबई–नागपूर (Mumbai- Nagpur Highway) प्रवास 8 तासांत पूर्ण होत आहे. परंतु इगतपुरी–चारोटी मार्ग आणि वाढवन बंदराची जोडणी पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भातून निघणारा माल आता पश्चिम किनाऱ्यावरील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या वाढवनपर्यंत थेट पोहोचेल.

नागपूर, अमरावती, वर्धा (wardha), भंडारा (Bhandara) आणि चंद्रपूरसह (Chandrapur) सर्व जिल्ह्यांमधील औद्योगिक क्षेत्रांना याचा फायदा होणार आहे. आयात-निर्यात प्रक्रियेला मोठी गती मिळेल आणि कंटेनर वाहतुकीत लक्षणीय वाढ होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची लॉजिस्टिक्स क्षमता प्रचंड प्रमाणात मजबूत होणार आहे.

उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला सुपर बुस्ट :

राज्य सरकारच्या मते, वाढवन बंदराशी थेट जोडणी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या व्यापार व्यवहारात ऐतिहासिक वाढ होईल. निर्यातदारांना जलद बंदर प्रवेश मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता वाढेल. विदर्भातील संत्री, कापूस, धान्य, स्टील आणि अनेक उद्योगांवर या निर्णयाचा सकारात्मक परिणाम होईल. (Maharashtra Mega Road Project)

याशिवाय पर्यटन, वाहतूक व्यवसाय, लॉजिस्टिक्स सेवा, वेअरहाउसिंग आणि औद्योगिक गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीही अपेक्षित आहे. मालवाहतूक वेळ आणि इंधन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने व्यापार खर्चही घटणार आहे.

News Title : Maharashtra Mega Road Project: Nagpur–Mumbai Travel to Get Faster as New Route Connects to Vadhavan Port

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now