महाराष्ट्रात महायुतीला फटका?; ‘या’ जागांवर महाविकास आघाडी सुसाट

Maharashtra Loksabha Election Result | आज 4 जूनरोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल लागत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पहिल्या सुरुवातीच्या कलांमध्ये जवळपास 24 मतदारसंघांमध्ये मविआने आघाडी घेतली आहे. तर, महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. मविआमध्ये कॉँग्रेसला 10 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागांची आघाडी मिळाली आहे.

महाविकास आघाडी ‘या’ जागांवर जोरात

महायुतीबद्दल बोलायचं झाल्यास भाजप 12 जागा, शिवसेना शिंदे गट 6 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या 2 जागांवर आघाडीवर असल्याचं समोर आलंय. एक्जिट पोलमध्ये (Maharashtra Loksabha Election Result) देखील महायुतीला फटका बसणार असल्याचं म्हटलं गेलं होतं. आज निकालाच्या कलामध्ये देखील काहीशी हीच स्थिती असल्याचं सध्या तरी दिसून येतंय.

दरम्यान, कोल्हापूर, हातकणंगले, बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी पहिल्या फेरीपासून कायम आहे. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी घेतलेली आघाडी सुद्धा कायम आहे.

महायुतीची स्थिती काय?

यासोबतच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आघाडी देखील कायम आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सुरुवातीच्या कलांमध्ये (Maharashtra Loksabha Election Result) आघाडी घेतल्याचे चित्र सध्या तरी दिसून येतंय.

News title –  Maharashtra Loksabha Election Result 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी ‘हा’ विक्रम मोडणार?

कल्याणमध्ये मतमोजणी खोळंबली, नेमकं काय घडलं?

शाहू महाराज vs संजय मंडलिक; कोल्हापुरात कुणी घेतली आघाडी?

सांगलीत विशाल पाटील सुसाट; चंद्रहार पाटील, संजयकाका पिछाडीवर

आता एका क्लीकवर जाणून घ्या कोणाची आघाडी तर कोणाची पिछाडी?