Maharashtra Lok Sabha Election Result 2024 | महाराष्ट्रात बीड या मतदारसंघात अटीतटीची लढत झाली. चुरशीच्या या लढतीत अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आहे. यामुळे भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे.
पंकजा मुंडे यांचा तब्बल 7 हजार मतांनी पराभव झाला आहे. या विजयानंतर बजरंग सोनवणे यांनी बीडच्या जनतेचे आभार मानले. या निवडणुकीच्या निकालावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली.
“आमचा हक्क आम्हाला देऊन टाका”
“माझ्या नादी लागू नका, तुम्ही गोडीगुलाबीने तुमचं काम करा. जर तुम्ही हे नाही दिलं मग मात्र मी 288 उमेदवार महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे उभे करणार. तुमचा कार्यक्रमच लावणार, सोडणार नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन बनवणार, गोरगरिबासाठी बनवणार.”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
पुढे त्यांनी (Maharashtra Lok Sabha Election Result 2024 )आपल्या उपोषणाबाबतही मोठी अपडेट दिली. येत्या 8 जूनला पुन्हा उपोषणाला बसत आहे. तुम्ही तत्काळ निर्णय घ्या. मी जाहीरपणाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस साहेबांना सांगतो की, तुम्ही आमचा हक्क आम्हाला देऊन टाका. असं यावेळी जरांगे पाटील म्हणाले.
बीडच्या विजयाचं श्रेय जरांगे पाटील यांना?
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, ” माझा राजकारण हा मार्ग नाहीये. त्या गुलालात आम्हाला आनंद नाही, आमच्या आरक्षणाच्या गुलालात आम्हाला आनंद आहे. मी राजकारणात नाही. कोणालाही पाडा असं म्हटलेलं नाही. आम्ही काय सांगितलं, कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा पण यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे.”
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचा सर्वाधिक परिणाम हा बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. रात्री उशीराने बीड लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर (Maharashtra Lok Sabha Election Result 2024 ) करण्यात आला. बजरंग सोनवणे यांच्या विजयाचं श्रेय आता मनोज जरांगे पाटील यांना दिलं जात आहे.
News Title – Maharashtra Lok Sabha Election Result 2024
महत्त्वाच्या बातम्या-
‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी
मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?
घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!
दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ






