महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर

Maharashtra Lok Sabha Election Result | आज (4 जून) सकाळी 8 वाजेपासून लोकसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता पर्यंतचा कल हा महाविकास आघाडीकडे झुकल्याचं सध्याचं तरी चित्र दिसून येतंय.

यामध्ये सुनेत्रा पवार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुडे, उदयनराजे आणि नवनीत राणा हे दिग्गज पिछाडीवर असल्याचं दिसून येतंय. महाविकास आघाडी सध्या 24 ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र आहे.

‘या’ दिग्गजांना धक्का

नवनीत राणा- भाजप 3,322 मतांनी पिछाडीवर
नारायण राणे – भाजप
सुधीर मुनगंटीवार- भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
सुनेत्रा पवार- राष्ट्रवादी
पंकजा मुंडे – भाजप
उदयनराजे- भाजप 27 हजार मतांनी पिछाडीवर
संजयकाका पाटील – भाजप 23 हजार मतांनी पिछाडीवर
राम सातपुते- भाजप
रणजीत निंबाळकर- माढा
आढळराव पाटील – राष्ट्रवादी

महाविकास आघाडी जोरात

महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पहिल्या सुरुवातीच्या कलांमध्ये जवळपास 24 मतदारसंघांमध्ये मविआने आघाडी घेतली आहे. तर, महायुती 19 जागांवर आघाडीवर आहे. मविआमध्ये कॉँग्रेसला 10 जागा, शिवसेना ठाकरे गटाला 10 जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 8 जागांची आघाडी मिळाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर, हातकणंगले, बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने जोरदार आघाडी घेतली आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज यांनी घेतलेली आघाडी पहिल्या फेरीपासून कायम आहे. हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी घेतलेली आघाडी सुद्धा कायम आहे.

News title – Maharashtra Lok Sabha Election Result

महत्त्वाच्या बातम्या-

राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांचं निकालाबाबत मोठं भाकीत!

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; ‘या’ जागांवर महाविकास आघाडी सुसाट

अहमदनगर लोकसभेची गणित फिरली; आकडेवारीत झाला मोठा फेरबदल

तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास नरेंद्र मोदी ‘हा’ विक्रम मोडणार?

कल्याणमध्ये मतमोजणी खोळंबली, नेमकं काय घडलं?