हवामान विभागाने मान्सूनबाबत दिली महत्त्वाची अपडेट; राज्यात मान्सून कधी दाखल होणार?

On: May 27, 2024 8:46 AM
Monsoon
---Advertisement---

Monsoon Update l बदलत्या वातावरणामुळे राज्यात ऊन, पावसाचा खेळ सुरु असल्याचे दिसत आहे. राज्यातील काही भागात अचानक उकाडा जाणवत आहे तर काही भागात हलकासा पाऊस पडल्याने वातावरण थंड पडत आहे. त्यामुळे मान्सून देखील लांबवणीवर जातोय. अशातच 9 तारखेला मान्सून अंदमानात दाखल होणार होता. मात्र आता 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात मान्सून कधी दाखल होणार? :

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर 10 जूनच्या दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर 15 जूनपर्यंत मान्सून कोल्हापूर, नाशिक, पुणे, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात दाखल होण्याचा अंदाज वर्तण्यात आला आहे. दरम्यान राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वी काही दिवस राज्यात उन्हाचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशातच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर ‘रेमल’ चक्रीवादळ धडकलं आहे. मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील होणार आहे. कारण चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर देखील समुद्राच्या लाटा उसळत आहेत.

Monsoon Update l राज्यात उष्णतेचा अलर्ट जारी :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मुंबई, खान्देश अशा एकूण २७ जिल्ह्यांत अवकाळीबरोबरच 1 जूनपर्यंत उष्णतासदृश्य स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच राज्यातल्या 18 जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असणार आहे.

अशातच हवामान खात्याने राज्यात उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह कोकण विभागात देखील 10 जूनच्या आसपास मान्सून बारसण्याची शक्यता आहे. तसेच 15 जून दरम्यान खानदेश, नगर, पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली आहे.

News Title – Maharashtra Latest Monsoon Update

महत्त्वाच्या बातम्या

केकेआरचा दणदणीत विजय; जाणून घ्या कोणाला किती रुपये मिळाले

या राशीच्या व्यक्तींनी जमिनीच्या वादात पडू नका

शरद पवारांना धक्का; दिल्लीतील बड्या नेत्याने सोडली साथ?

दुपारपर्यंत उष्णतेनं अंगाची लाहीलाही; संध्याकाळी पावसाचा धिंगाणा

राज्यातील ‘या’ भागात येत्या 24 तासात मान्सूनची हजेरी

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now