31 December Rules | २०२५ हे वर्ष निरोप घेत असून अवघ्या काही तासांत २०२६ या नव्या वर्षाचे आगमन होणार आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असताना राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मद्यविक्रीच्या वेळेत विशेष सूट दिली आहे. ३१ डिसेंबर २०२५ आणि १ जानेवारी २०२६ या दोन्ही दिवशी दारूची विक्री सुरू राहणार असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सुधारित वेळा लागू करण्यात आल्या आहेत. (New Year Liquor Rules)
राज्य शासनाने नववर्ष साजरे करताना नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी मद्यविक्रीची दुकाने, बिअर बार, परवाना कक्ष, क्लब आणि हॉटेल्स निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परवान्याच्या प्रकारानुसार मद्यविक्रीची वेळ वेगवेगळी असणार असून याबाबत उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट निर्देश जारी केले आहेत.
परवाना प्रकारानुसार मद्यविक्रीच्या सुधारित वेळा :
परदेशी मद्याच्या किरकोळ विक्रीसाठी असलेल्या एफएल-२, उच्च व अतिउच्च श्रेणीतील एफएल-२ तसेच एफएलडब्ल्यू-२ आणि एफएलबीआर-२ परवान्यांच्या दुकानांना रात्री १०.३० वाजल्यापासून पहाटे १ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर एफएल-३ परवाना कक्ष आणि एफएल-४ क्लब्ससाठी पोलीस आयुक्तालय क्षेत्रात रात्री १.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत वेळ वाढवण्यात आली आहे, तर इतर भागांत ही वेळ रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत असणार आहे. (December 31 Alcohol Sale)
बिअर बारसाठी असलेल्या नमुना ‘ई’ आणि ई-२ परवान्यांअंतर्गत मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे. देशी मद्य विक्रीसाठी असलेल्या सीएल-३ परवान्यांमध्ये महानगरपालिका तसेच ‘अ’ आणि ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांत रात्री ११ ते पहाटे १ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे, तर इतर ठिकाणी रात्री १० ते पहाटे १ वाजेपर्यंत विक्री करता येणार आहे.
31 December Rules | कायदा-सुव्यवस्थेवर सरकारचा भर, कडक बंदोबस्त तैनात :
सरकारने स्पष्ट केले आहे की सार्वजनिक सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार या सवलतीच्या वेळेत कपात करण्याचे किंवा बदल करण्याचे अधिकार असतील. नववर्षाच्या जल्लोषात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. (31 December Rules)
महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांनी सांगितले की ड्रंक अँड ड्राइव्ह तसेच अवैध दारूविक्री रोखण्यासाठी अंमलबजावणी पथके अधिक बळकट करण्यात आली आहेत. अधिकृत निर्देशानुसार वेळ वाढवण्यात आली असून २१ समर्पित पथके तैनात करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे थर्टी फस्टला जल्लोष करताना नियम पाळणे प्रत्येक नागरिक आणि व्यावसायिकासाठी बंधनकारक असणार आहे.






