राज्याचं प्रशासन कोलमडणार? सरकारी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची हाक

On: February 13, 2026 12:12 PM
Government Employee Strike
---Advertisement---

Government Employee Strike | राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. केवळ आश्वासनांवर समाधान न मानता ठोस शासन निर्णयाची मागणी करत कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. सुधारित पेन्शन योजनेसह विविध मुद्द्यांवर सरकारने तातडीने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी पुढे आली आहे.

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपून बराच काळ उलटल्यानंतरही अधिकृत शासन निर्णय निघालेला नसल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनांनी आता निर्णायक लढ्याची तयारी सुरू केली आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या? :

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना किंवा त्या धर्तीवर सुधारित पेन्शन योजना लागू करणे. यासोबतच १०:२०:३० या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी आणि प्रलंबित वेतन त्रुटी दूर करण्याची मागणी आहे. राज्यात सध्या सुमारे दोन लाखांहून अधिक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे, हा मुद्दाही संघटनांनी अधोरेखित केला आहे. (Government Employee Strike)

निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याची मागणीही जोर धरत आहे. देशातील अनेक राज्यांनी निवृत्तीचे वय वाढवले असताना महाराष्ट्रात मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

Government Employee Strike | केंद्र-राज्य तफावत आणि संपाचा इशारा :

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १ जुलै २०२४ पासून ३ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू केला आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप तत्सम निर्णय जाहीर झालेला नाही, असा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहे. तसेच ‘टीईटी’ धोरणामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता आहे, तर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रश्नही प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे. (Government Employee Strike News)

मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सरकारने लेखी निर्णय घेतला नाही, तर राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला जाईल. यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने यावेळी केवळ घोषणांवर कर्मचारी माघार घेणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

News Title: Maharashtra Government Employees Warn of Indefinite Strike Over Pension and Pending Demands

Government Employee Strike Maharashtra, Old Pension Scheme Maharashtra, State Employees Protest, DA Hike Maharashtra, Retirement Age 60, राज्य सरकारी कर्मचारी संप, जुनी पेन्शन योजना, महागाई भत्ता, महाराष्ट्र कर्मचारी आंदोलन

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now