भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

On: November 21, 2024 8:14 AM
Maharashtra election exit poll result 2024 
---Advertisement---

Maharashtra election | महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी काल 20 नोव्हेंबररोजी मतदान पार पडले. राज्यात यंदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होणार आहे. मतदान पार पडल्यानंतर विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी जाहीर होत आहे. परवा म्हणजेच 23 नोव्हेंबररोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच धक्कादायक एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर येत आहे. (Maharashtra election)

अशात एका मिडिया एक्झिट पोल्समध्ये आश्चर्यकारक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला या निवडणुकीत 100 चा आकडा गाठताना देखील नाकेनऊ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक संस्थांनी तर भाजपला 80 पेक्षाही कमी जागांवर यश मिळू शकतं, असा अंदाज वर्तवला आहे.

एक्झिट पोल्स कुणाच्या बाजूने?

काही एक्झिट पोल्सनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 118 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर मविआला तब्बल 150 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पोलनुसार, भाजपला केवळ 78 जागांवर यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शिंदे गटाला 26, अजित पवार गटाला 14 जागांवर यश मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीला राज्यात मोठं यश मिळणार, असे अंदाज अनेक पोल्समध्ये वर्तवण्यात आले आहेत. पोलनुसार, काँग्रेसला महाविकास आघाडीत सर्वाधिक 60 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला 44 आणि शरद पवार गटाला 46 जागांवर यश मिळणार असल्याचं समोर आलंय. (Maharashtra election)

जवळपास सर्वच पोलमध्ये यंदा महाविकास आघाडीला यश मिळणार, असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. आता हे चित्र कितपत खरं ठरणार ते आता थेट 23 तारखेलाच स्पष्ट होणार आहे. या पोल्सवर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील उमटत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचंही लक्ष आता निकालाकडे असणार आहे.

कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले?

महायुती
भाजप – 149 जागा
एकनाथ शिंदे यांची शिवसेना – 81 जागा
अजित पवार राष्ट्रवादी – 59 जागा

महाविकास आघाडी
कॉँग्रेस – 101 जागा
शरद पवार राष्ट्रवादी – 86 जागा
उद्धव ठाकरे शिवसेना – 95 जागा (Maharashtra election)

News Title – Maharashtra election exit poll result 2024 

महत्त्वाच्या बातम्या-

आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?

परळीत जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

ए. आर. रेहमान यांच्या पत्नीला किती मिळणार पोटगी?

Join WhatsApp Group

Join Now