मतदान कार्ड हरवलंय? तर या ओळखपत्रांआधारे करता येणार मतदान

On: November 19, 2024 11:00 AM
Voter ID
---Advertisement---

Voter ID l राज्यात उद्या विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, वंचित, बंडखोर, अपक्ष हे पक्ष संपूर्ण तयारीसह मैदानात उतरलेले आहेत. अशातच आता जनतेच्या मनातील कौल उद्या मतपेटीत बंद होणार आहे. मात्र जर मतदानाच्या दिवशी तुम्हाला नेमकं मतदान कार्ड सापडलं नाही तर तुम्ही काही काळजी करू नका.

मतदान केंद्रावर मोबाईलला बंदी :

निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदान कार्डसह 12 ओळखपत्रांआधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता. त्यामुळे जर तुम्हाला मतदान ओळखपत्र जवळ नसल्यास कोणताही एक मूळ पुरावा मतदान केंद्रावर दाखवावा लागणार आहे. मात्र त्यावेळी संबंधितांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही. त्यामुळे त्यांना मोबाईलमधील ओळखपत्र दाखवता येणार नाही.

मतदाराची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा लागणार आहे. परंतु ते 12 कागदपत्र नेमके कोणते आहेत हे आपण आता जाणून घेऊयात…

Voter ID l मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हे 12 कागदपत्र आवश्यक :

आधार कार्ड
मनरेगा जॉब कार्ड
टपाल खात्याचे पासबुक
आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
वाहन चालक परवाना
पॅन कार्ड
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्ट कार्ड
भारतीय पारपत्र-पासपोर्ट
निवृत्ती वेतन कागदपत्र
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा ओळखपत्र
खासदार, आमदारांना देण्यात आलेले ओळखपत्र
दिव्यांगाना देण्यात आलेले ओळखपत्र या आधारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

News Title : Maharashtra Assembly Election 12 Documents To Cast Your Vote

महत्वाच्या बातम्या –

प्रचारसभा थंड होताच ‘खिशे’ झाले गरम, कोकणात मध्यरात्री पडला पैशांचा पाऊस?

अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी, भाजपने ‘ते’ आरोप फेटाळले

अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?, नेमकं काय घडलं?

प्रेमविवाहाला संमती ते नोकरीच्या नव्या संधी.. आज ‘या’ राशींना ग्रहमान देतील साथ!

राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now