Mahadev Munde Murder Case | महादेव मुंडे हत्येप्रकरणात आता नवे खुलासे समोर येत आहेत. सुशील कराड यांनी “महादेव मुंडेंना आम्ही ओळखत नव्हतो,” असं स्पष्ट सांगितल्यानंतर आता महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवं राजकीय आणि तपासात्मक वळण मिळालं आहे. (Mahadev Munde Murder Case)
सुशील कराड म्हणाले होते – “महादेव मुंडेंना आम्ही कधी पाहिलंही नव्हतं” :
सुशील कराड यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “ना मी, ना माझे वडील, ना माझा भाऊ – आम्ही कोणीतरीही महादेव मुंडेंना ओळखत नव्हतो.” त्यामुळे या खुनाशी आमचा काहीही संबंध नाही, सर्व आरोप खोटे आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. (Mahadev Munde Murder Case)
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी यावर प्रत्युत्तर देताना म्हटलं, “जर महादेव मुंडेंना ओळखत नव्हता, तर पोलिसांना का कॉल केला? आणि तपास थांबवण्याचा फोन कुठून आला होता?”
त्यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांचे CDR (Call Detail Record) काढण्याची मागणी केली आहे. विशेषतः सानप, भास्कर केंद्रे, डीवायएसपी कविता नेहरकर, आणि ठाकूर यांच्याही कॉल रेकॉर्डची चौकशी झाली पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
Mahadev Munde Murder Case | CBI चौकशीची मागणी, मध्यस्थीचे आरोप आणि नवे नाव समोर :
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेत CBI चौकशीची मागणी केली आहे. याच प्रकरणात एका अनामिक व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधून “ताईच्या नावाने फ्लॅट करतो, मीडिया ट्रायल थांबवा,” असा प्रस्ताव दिला होता, असा आरोपही त्यांनी केला. (Mahadev Munde Murder Case)
या व्यक्तीचं नाव त्यांनी पंकज कुमावत यांना सांगितलं असून, सुशील कराड, त्यांचे वडील आणि मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीचा रोल तपासण्याची मागणीही केली आहे.
राजकीय व पोलिस यंत्रणेवरही संशय, ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप :
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरही संशय व्यक्त करत म्हटलं की, “पोलीस अधिकारी सकपाळ यांनी माझ्या भावाला आरोपींचे नंबर दिले होते.” तसेच शिरसाळा येथे पोलीस अधिकारी दहिफळे यांच्या सत्काराला गोट्या गित्ते उपस्थित होते, हेही त्यांनी अधोरेखित केलं.
त्यांचं स्पष्ट मत आहे की, “खरे आरोपी मोकाट सुटले आहेत आणि त्यांच्यावरच कठोर कारवाई व्हायला हवी.”






