Love and Loan Recovery | प्रेम (Love) सर्व काही शक्य करून दाखवतं. ऑफिसमध्ये एकत्र काम करताना प्रेमात पडणे सामान्य आहे, पण कर्जवसुलीसाठी (Love and Loan Recovery) गेलेल्या व्यक्तीला कर्जदाराच्या पत्नीशी प्रेम झाल्याचे कधी ऐकले आहे का?
कर्जवसुली ते लग्न
ज्या व्यक्तीने कर्ज घेतले होते, त्याच्याकडून पैसे वसूल करताना लोन रिकवरी एजंटला (Loan Recovery Agent) त्याची पत्नी आवडली. विशेष म्हणजे, पत्नीकडूनही त्याला प्रतिसाद मिळाला. प्रेमाच्या आहारी जाऊन पत्नीने पती आणि घर सोडले आणि लोन रिकवरी एजंटसोबत (Loan Recovery Agent) लग्न केले.
बिहारमधील (Bihar) घटना
ही घटना बिहारमधील (Bihar) जमुई (Jamui) जिल्ह्यातील आहे. पवन नावाचा एक तरुण, जो लोन रिकवरी एजंट (Loan Recovery Agent) आहे, उपेंद्र यादव (Upendra Yadav) नावाच्या व्यक्तीच्या घरी कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी जात होता. यादरम्यान त्याची ओळख उपेंद्रची पत्नी इंदिरा कुमारीशी (Indira Kumari) झाली.
पहिल्याच नजरेत दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागले. कर्जाच्या वसुलीच्या निमित्ताने पवन वारंवार त्या घरी जाऊ लागला. त्यामुळे दोघांमधील जवळीक वाढली. त्यांनी फोन नंबरची (Phone Number) देवाणघेवाण केली आणि त्यांचे बोलणे प्रेमात बदलले. मग दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पळून जाऊन लग्न
ठरल्याप्रमाणे, महिला आपल्या पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली. मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केले. महिलेने सांगितले की, लग्नानंतर तिला समजले की तिचा पती रोज दारू पितो आणि नशेत तिला मारहाण करतो. या सगळ्याला कंटाळून ती आधीच पळून जाण्याचा विचार करत होती. त्याचवेळी तिच्या आयुष्यात लोन रिकवरी एजंटची (Loan Recovery Agent) एन्ट्री झाली आणि तिने त्याच्याशी लग्न केले. (Love and Loan Recovery)
Title : Love and Loan Recovery Agent Falls in Love with Borrowers Wife






