महाराष्ट्रातील नेत्यांची इतर राज्यात कमाल! विनोद तावडेंच्या कष्टाचं झालं चीज

On: June 6, 2024 11:50 AM
Loksabha Result
---Advertisement---

Loksabha Result l लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर संपूर्ण राज्याचे राजकारण बदलले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र अशातच महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर अन्य राज्यांमध्ये सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देत आपापल्या पक्षांना चांगले यश मिळवून दिले आहे.

विनोद तावडेंनी महाराष्ट्राबाहेर दाखवला करिष्मा :

अशातच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी महाराष्ट्रातराहून महाराष्ट्राबाहेर त्यांचा करिष्मा करून दाखवून स्वतःला सिद्ध केले आहे.
पांडे हे उत्तर प्रदेशचे प्रभारी आहेत. त्यांनी तिथे काँग्रेस-समाजवादी पार्टीमध्ये समन्वय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. काँग्रेसचे पक्षसंघटन कमकुवत झालेले होते, त्याची पाचस्तरीय बांधणी सुरू केली. काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या 17 जागांवरील पक्षाचे जुने कार्यकर्ते, नेते यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना कामाला लावले.

पांडे हे काँग्रेसच्या कार्यसमितीचे सदस्यदेखील आहेत. 2014 च्या निवडणुकीतही ते उत्तर प्रदेशचे प्रभारी होते आणि तेव्हापासून ते राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असतात, त्याचा फायदा यावेळी झाला आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभांना उत्तर प्रदेशात मोठी मागणी होती, त्याचे नियोजन पांडे यांनीच केले होते.

Loksabha Result l तिहेरी कामगिरी करण्यात मोठा वाटा :

आता 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटना मजबूत करण्याची मोहीम मी 10 जूनपासून सुरू करणार असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे. तसेच 2019 मध्ये उत्तर प्रदेशात केवळ 1 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने यावेळी 6 जागा जिंकल्या आहेत.

तावडे हे बिहारमध्ये भाजपचे प्रभारी आहेत. नितीशकुमार यांना पुन्हा एनडीएसोबत आणण्यातही त्यांची भूमिका महत्वाची राहिलेली होती. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी तेथील जातीय समीकरणांची जुळवाजुळव करणे, लहान मित्रपक्षांना जोडणे आणि जागावाटप सुरळीत होईल याची काळजी करणे अशी तिहेरी कामगिरी करण्यात तावडे यांचा मोठा वाटा राहिला आहे.

News Title : Loksabha election Vinod Tawade

महत्त्वाच्या बातम्या

कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं

अरे व्हा! या कारने घातलीये तरुणाईला भुरळ; किंमत व स्पेसिफिकेशन काय?

…तर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत; ‘या’ नेत्याने केला सर्वात मोठा दावा

इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now