महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी! फडणवीसांनंतर ‘या’ नेत्यानेही घेतला मोठा निर्णय

Lok Sabha result | महाराष्ट्रात लोकसभेचा धक्कादायक निकाल लागला आहे. राज्यात महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. तर, महाविकास आघाडीने 30 जागा काबिज केल्या आहेत. त्यात भाजपला 10 जागाही मिळवता आल्या नाहीत. महाराष्ट्रातील पराभव हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसतंय.

आज (5 जून) पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या अपयशाला आपण कारणीभूत असल्याचं सांगत फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजप नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasehkhar Bawankule) यांनी फडणवीस यांच्या निर्णयानंतर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “विधानसभेसाठी, संघटनेला पूर्ण वेळ देण्यासाठी फडणवीस यांनी केंद्राकडे मागणी केली आहे. त्यांनी तशी भावना केंद्रीय नेतृत्वाकडे व्यक्त केली आहे. सरकारमध्ये काम करूनही ते संघटनेसाठी काम करू शकतात. केंद्राशी बोलून मग पुढचा निर्णय फडणवीस घेतील.”, असं बावनकुळे म्हणाले (Lok Sabha result)आहेत.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

पुढे ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या निवडणुकीला पूर्ण वेळ देण्यासाठी केंद्राला विनंती केली आहे. त्यांची ही त्यागाची भूमिका आहे. त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे. सरकारच्या बाहेर येऊन त्यांनी काम करण्याची गरज नाही. त्यांना सरकारमध्ये राहून देखील काम करता येईल. आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी सरकारमध्ये राहून आम्हाला प्रोटेक्शन द्यावं.”,असं बावनकुळे म्हणाले आहेत.

आता फडणवीसांच्या मनधरणीचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न सफल होणार का फडणवीस वेगळा निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. फडणवीस यांनी अचानक घेतलेल्या या (Lok Sabha result) निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सध्या याचीच चर्चा रंगली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. त्यांनी मला सरकारमधून मुक्त करावं.ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन.”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

News Title – Lok Sabha result  Chandrasehkhar Bawankule Big decision

महत्त्वाच्या बातम्या-

“देवेंद्र फडणवीस राजकारणातील आनंदीबाई, पक्ष फोडणारा खलनायक”

पराभवानंतर पंकजा मुंडेंची धक्कादायक प्रतिक्रिया, म्हणाल्या…

ड्रीम गर्ल ते ड्रामा क्वीन..’या’ बॉलीवुड कलाकारांनी राजकीय मैदानही गाजवलं

‘या’ तारखेला होणार शपथविधी, मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान?

आता निलेश लंके सुद्धा इंग्रजीत बोलणार!, खासदार झाल्यानंतर केली मोठी घोषणा