सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल

lok sabha result 2024 | महाराष्ट्रात बारामती येथे कुटुंबातील व्यक्तीच एकमेकांविरोधात उभे राहील्याचं दिसून आलं. बारामती लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना झाला. या निवडणुकीत शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी आपल्याच वहिनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. कुटुंबाविरुद्ध उभं राहण्याचा महाराष्ट्रातील हा एकच मतदार संघ नाही, तर देशातही बऱ्याच ठिकाणी असे सामने झाले.

हरियाणामध्ये सासऱ्याच्या विरोधात थेट दोन सुना निवडणुकीत उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीचा निकालही अत्यंत धक्कादायक लागला. ही जागा होती हरियाणातील हिसारची. येथे चौटाला कुटुंबीय एकमेकांविरोधात लढले. एवढे सगळे लढूनही येथे सर्वांच्या हाती अपयश आलं.

एकाच कुटुंबातील चार जण निवडणुकीच्या रिंगणात

या ठिकाणी कुटुंबातील एकाचाही विजय झाला नाही. येथे दोन सुना आणि चुलत सासरे रिंगणात होते. चौटाला कुटुंबीयातील मतभेद या निवडणुकीत चर्चेतील विषय बनला होता. हिसार येथे भाजपने रणजित चौटाला यांना उमेदवारी दिली होती.

त्यांच्याविरोधात जजपाच्या आमदार नयना चौटाला आणि आयएनएलडी पक्षाच्या सुनयना चौटाला निवडणुकीच्या रिंगणात होत्या. रणजित चौटाला हे दोघींचे चुलत सासरे लागतात. या लढतीत (lok sabha result 2024) तिघांपैकी एकाचाही विजय झाला नाही.

निवडणुकीत हाती आला भोपळा

काँग्रेसच्या जय प्रकाश यांनीच बाजी मारत विजय आपल्या नावावर केला. रणजीत चौटाला यांना लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. तर नयना आणि सुनयना यांना प्रत्येकी जेमतेम 22 हजारांवर मते मिळाली.

सुनयना यांचे पती पक्षाचे नेते अभयसिंह चौटाला यांचाही कुरुक्षेत्र येथून पराभव झाला. येथे भाजपचे नवीन जिंदाल विजयी झाले. अभयसिंह यांना 78.708 मते मिळाली. एकाच कुटुंबातील इतके (lok sabha result 2024) जण लोकसभेत उभे राहून त्यांच्यातील एकानेही विजयी गुलाल उधळला नाही. त्यामुळे सध्या या कुटुंबाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

News Title – lok sabha result 2024 haryana chautala family

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचा परिणाम, शेतकरी कर्जमाफी होणार?

राज्यात 26 मराठा खासदार, पाहा इतर जातींचे किती खासदार आले निवडून

नाना पटोले भावी मुख्यमंत्री; ‘त्या’ बॅनरमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्रातील नेत्यांची इतर राज्यात कमाल! विनोद तावडेंच्या कष्टाचं झालं चीज

कुठलाच प्रचार केला नाही, तरी तिसरी पास सालगड्याला पडली लाखभर मतं