वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं

On: June 4, 2024 1:48 PM
Lok Sabha Elections Result 2024
---Advertisement---

Lok Sabha Elections Result 2024 | लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सध्या मतमोजणी केली जात आहे. आता पर्यंत जवळपास 12 हून अधिक फेऱ्या झाल्या आहेत. त्यानुसार राज्यात महाविकास आघाडी सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे. तर, महायुतीला बऱ्याच ठिकाणी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यातच वंचित बहुजन आघाडीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआसोबत येणार की नाही, यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. मात्र, वंचतने बहुतांश मतदारसंघात आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले.

5 मतदारसंघातील वंचितचे उमेदवार

वंचितने 5 मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, परभणीतून पंजाबराव डख हे वंचितचे उमेदवार असून पुण्यातून वसंत मोरे आणि धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकर हे वंचितकडून उभे राहिले आहेत.

सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात वसंत मोरे यांना केवळ 11,840 मिळाली आहेत. तर, अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना दुपारी 12 वाजेपर्यंत 84,556 मतं मिळाली आहेत.बीडमधून (Lok Sabha Elections Result 2024 ) वंचितचे अशोक हिंगे यांना 3199 मतं मिळाली असून ते चौथ्या क्रमांकावर आहेत. यासोबतच परभणी लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमेदवार पंजाबराव डख हे 20348 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पप्रकाश आंबेडकर स्वतः पिछाडीवर

वंचितचे धाराशिवमधील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांना 9141 मतं मिळाली आहेत.धाराशिव येथे ओमराजे निंबाळकर यांनी 1 लाख 82 हजार 805 मतं घेऊन आघाडी घेतली (Lok Sabha Elections Result 2024 ) आहे. पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ, परभणीत शिवसेनेचे संजय जाधव, बीडमध्ये शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे तर,अकोला या मतदारसंघातून काँग्रेसचे अभय पाटील सध्या आघाडीवर आहेत.

News Title –  Lok Sabha Elections Result 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा

मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

वसंत मोरेंना पुणेकरांनी नाकारलं; फॉलोवर्स एवढेही मतं पडली नाहीत

ओमराजे निंबाळकरांचं डोंगराएवढं लीड… अर्चना पाटील यांचा पराभव अटळ?

जालन्यात रावसाहेब दानवेंचं टेंशन वाढलं! कॉँग्रेस उमेदवाराची जोरदार आघाडी

Join WhatsApp Group

Join Now