भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली

Lok Sabha Election | लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत भाजपला 240 जागावर समाधान मानावे लागले आहे. आता सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला घटकपक्षांची साथ लागणार आहे. आजवर घटक पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या भाजपला आता याच पक्षांवर अवलंबून राहावं लागत आहे.

मागील 10 वर्षात भाजपला बहुमतापेक्षा यावेळी कमी संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू ( N. Chandrababu Naidu) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

तेजस्वी यादव आणि नितीशकुमार एकाच विमानात

अशात आज (5 जून) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. आज एनडीए आणि इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. नितीशकुमार यांना दोन्ही गटांनी संपर्क साधला आहे. अशात ते तेजस्वी यादव यांच्यासोबत दिसून आल्याने भाजपची धाकधूक वाढली आहे.

भाजप आणि इंडिया आघाडी यांनी आपापल्या सहकारी पक्षांना सरकार स्थापनेच्या मोर्चेबांधणीसाठी दिल्लीत बोलवलंय. या सर्व गोष्टीमध्ये नितीश कुमार यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आता (Lok Sabha Election )ते काय निर्णय घेतात, यावर दोन्ही आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.

“मोदी फॅक्टर संपला आहे,आम्ही इंडीया आघाडी सरकार..”

सध्या नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांचा फोटो व्हायरल होत आहे. नितीशकुमार यांच्या पाठीमागील जागेवर तेजस्वी बसलेले आहेत. या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. यावरून आता (Lok Sabha Election ) राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

पाटणा विमानतळावर बोलताना तेजस्वी यादव यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली होती.’मोदी फॅक्टर संपला आहे. आम्ही इंडीया आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी दिल्लीला जाणार आहोत.’, असं ते म्हणाले होते. अशात नितीश कुमारसोबत तेजस्वी यादव दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

News Title :  Lok Sabha Election Tejashwi Yadav and Nitish Kumar

महत्त्वाच्या बातम्या-

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!