इंडिया आघाडी करु शकते सत्तेवर दावा, देशात असा पालटू शकतो खेळ

Lok Sabha election results 2024 | लोकसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर झाला आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपने केंद्रात आपली सत्ता कायम ठेवली. मात्र, या निवडणुकीत एनडीए सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला या निवडणुकीत 240 जागा मिळाल्या आहेत. आता पुढे सत्ता स्थापनेसाठी त्यांना एनडीएतील घटक पक्षांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.

एनडीए सरकारला 293 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे इंडिया आघाडीने देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे. इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. कॉँग्रेसने यावेळी आपली कामगिरी सुधारत तब्बल 99 जागांवर विजय मिळविला आहे.

नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांची भूमिका महत्वाची

अशात एनडीए सरकार बहुमताचा 272 हा आकडा पार करत असली तरी त्यात भाजपाला आपल्या सत्तेसाठी घटक पक्षांच्या आधारावर अवलंबून राहावे लागणार आहे. yतेलुगू देसम पार्टी, जनता दल (युनायटेड), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) या प्रमुख घटक पक्षांचा समावेश आहे.

या घडामोडींमध्ये इंडिया आघाडी आता या घटक पक्षांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करून सत्ता स्थापनेसाठी दावा करू शकते, असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे, इंडिया आघाडीमध्ये कधीकाळी जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार व टीडीपीचे एन. चंद्राबाबू नायडू हे सहभागी होते.

इंडिया आघाडीकडून प्रयत्न सुरू

आता जरी जेडीयू आणि टीडीपी या दोन्ही पक्षांनी (एकूण जागा 28) इंडिया आघाडीमध्ये येणे पसंत केले तरीही इंडिया आघाडी बहुमताचा आकडा पार करू शकत नाही. या दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन इंडिया आघाडीच्या जागा 262 पर्यंतच जातात. त्यामुळे इंडिया आघाडी आपल्या बाजूने इतरांना देखील वळवण्याचा प्रयत्न येथे करू शकते.

आज (5 जून) दिल्लीत भाजप आणि इंडिया आघाडी (Lok Sabha election results 2024) यांनी आपापल्या सहकारी पक्षांना सरकार स्थापनेच्या मोर्चेबांधणीसाठी दिल्लीत बोलवलंय. या सर्व गोष्टीमध्ये नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. आता (Lok Sabha Election )ते काय निर्णय घेतात, यावर दोन्ही आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.

नितीशकुमार यांची लोकसभा अध्यक्षपदासाठी मागणी?

अशातच काही मीडिया रिपोर्टनुसार, नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती समोर येत आहे. भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून आघाडीतील मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा आहे.कारण, पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका (Lok Sabha election results 2024) महत्त्वाची असते.आता भाजप यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Title : Lok Sabha election results 2024 India Alliance

महत्त्वाच्या बातम्या- 

“माझ्या नादी लागू नका, तुमचा कार्यक्रमच लावणार”; मनोज जरांगेंचा थेट इशारा

भाजपची धाकधूक वाढली! नितीश कुमारसोबत एकाच विमानाने ‘या’ नेत्याने गाठली दिल्ली

लोकसभा निकालावर शरद पोंक्षेंची पोस्ट, म्हणाले ‘हिंदूच…’

‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

मोठी बातमी! नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेंच्या ताफ्यातील गाडीचा अपघात