मोदींची लाट ओसरली?; महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने भाजपचं टेन्शन वाढवलं

Lok Sabha Election Result | लोकसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या कलात भाजप आघाडीवर असली तरी भाजपला पाहिजे तशा जागा मिळताना दिसत नाहीये. हा भाजपासाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपचं टेन्शन वाढलं

उत्तर प्रदेशाने भाजपचं टेन्शन वाढवलं आहे. उत्तर प्रदेशात भाजप अवघ्या 32 जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पार्टी 37 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशात भाजपला सर्वाधिक जागा मिळतील असा सर्वांचा अंदाज होता. मात्र हा अंदाज फोल ठरला आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशातील कल अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्रातही भाजप धोबीपछाड होताना दिसत आहे. कलानुसार महाराष्ट्रात महायुतीला अवघ्या 19 जागा मिळताना दिसत आहेत. तर महाविकास आघाडीला 27 जागांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा सेट बॅक असल्याचं सांगितलं जात आहे.

मोदींची लाट ओसरली?

युपीमध्ये अखिलेश यादव यांचा तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचा करिष्मा पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे. ज्या पद्धतीने कल येत आहेत, त्यानुसार मोदींची लाट ओसरल्याचं दिसून येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शरद पवारांचा जलवा; 10 पैकी 10 जागांवर जोरदार मुसंडी

पुण्यात मतमोजणी सुरु असताना घडला धक्कादायक प्रकार!

अजित पवारांना मोठा धक्का, बारामतीही हातातून जाणार?

लोकसभा निकालाच्या भीतीने शेअर मार्केटमध्ये मोठे बदल; पुढे काय होणार?

महायुतीमधील दिग्गज उमेदवारांना धक्का; नारायण राणे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवारसह उदयनराजे पिछाडीवर