वंचित बहुजन आघाडीने वाढवलं भाजपचं टेन्शन, ‘या’ मतदारसंघात पराभव होणार?

On: April 23, 2024 2:24 PM
Lok Sabha Election 2024 Rahul Gaikwad withdrew his candidature in Solapur
---Advertisement---

Lok Sabha Election 2024 | सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, महायुतीकडून येथे राम सातपुते यांना तिकीट मिळालंय. मात्र, वंचितनेही या मतदारसंघात उमेदवार उतरवल्याने भाजपसह मविआचीही चिंता वाढली होती.

वंचितकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी अचानक सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे तर महाविकास आघाडीला सुखद धक्का लागला आहे.

राहुल गायकवाड यांनी वंचितच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना पूर्वकल्पना न देता उमेदवारी मागे घेतली. इतकंच नाही तर त्यांनी प्रकाश आंबेडकर यांनाही याबाबत काहीच न सांगता माघार घेतली. त्यांनी माघार घेण्यामागील कारण एका व्हीडीओद्वारे स्पष्ट केलं आहे. यामुळे सोलपुरात भाजपचं टेंशन वाढलंय.

वंचितच्या उमेदवाराची माघार

‘मी संविधान वाचवण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे कुठंतरी माझ्या उमेदवारीमुळे संसदेत जाऊन बसतील. त्यामुळे मी उमेदवारी मागे घेत आहे.’, असं राहुल गायकवाड यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर, सध्याची सोलापूरची परिस्थिती बघता मी काँग्रेस आणि भाजप या दोघांना हरवायला नाही, तर भाजप कसं निवडून येईल असं चित्र निर्माण झाल्याचं वाटतं होतं. भाजप उमेदवाराच्या विजयाचं कारण मला बनायचं नव्हतं. त्यामुळे मीच निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. असं राहुल गायकवाड यांनी म्हटलं. दरम्यान, राहुल गायकवाड यांच्या आरोपांवर भाजपाकडूनही लागलीच प्रत्युत्तर देण्यात आलं.

सोलापुरात भाजप उमेदवाराच्या अडचणी वाढल्या

संविधान वाचवण्यासाठी उलट भाजपने प्रयत्न केले आहेत. यामागे एक चाल आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी संविधानासोबत छेडछाड केली आहे. वंचितच्या उमेदवारा मागे महाविकास आघाडीचे षडयंत्र आहे. यापूर्वी अनेकदा मविआ किंवा काँग्रेसने असे गलिच्छ राजकारण केले आहे, असा आरोप भाजप नेते आणि लोकसभा निवडणूकीचे प्रमुख शहाजी पवार यांनी केले आहेत.

त्यातच सोलापूरमध्ये अद्याप एमआयएमने उमेदवार दिलेला नाही.मात्र, संविधानाच्या संरक्षणाचे काम करेल अशा उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका एमआयएमने घेतली आहे. त्यामुळे याचा फायदा मविआ उमेदवार प्रणिती शिंदेंना होऊ शकतो. तर, भाजपचे राम सातपुते यांची लढाई यामुळे अवघड होऊ शकते.

News Title : Lok Sabha Election 2024 Rahul Gaikwad withdrew his candidature in Solapur

महत्त्वाच्या बातम्या-

मराठमोळ्या ऋतुराजची पलटण केएल राहुलला धक्का देणार? CSK Vs LSG संघ आज भिडणार

सूरतमध्ये नवा ट्विस्ट, गुलाल उधळला, मात्र काँग्रेसच्या मागणीनं भाजपच्या आनंदावर पाणी?

धक्कादायक!!!, बारामतीत आणखी एका उमेदवाराला तुतारी चिन्ह, निवडणूक आयोग काय निर्णय घेणार?

अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीने पोलिसांवर केले मोठे आरोप; नेमकं प्रकरण काय?

सूर्यदेवाच्या कृपेने या दोन राशींना मिळणार चांगला पैसा

Join WhatsApp Group

Join Now