Lok Sabha Election 2024 | देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल आज (4 जून) जाहीर होत आहेत. अजूनही मतमोजणी सुरू असून काही तासातच स्पष्ट निकाल समोर येईल. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) 400 पारचा आकडा पार करेल, असा दावाच केला होता.
पण, सध्याचं चित्र पाहिलं तर एनडीए आघाडी 300 जागांच्या पलीकडेही जाते की नाही, त्यावर प्रश्न आहे. यावेळी कॉँग्रेसने आपली कामगिरी चांगलीच सुधारली आहे. सध्या एकूण 543 जागांपैकी 270 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी 251 जागांवर आघाडीवर आहे.
काँग्रेसचा सर्वात मोठा डाव
आताची स्थिती पाहता एनडीए आघाडीला काठावर बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे कॉँग्रेस आता अधिक सक्रिय झाल्याचं दिसतंय.काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.
कॉँग्रेसने जर तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांच्याशी बोलणी केली तर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जाऊ शकतो. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इंडिया आघाडी तेलुगु देसम (Lok Sabha Election 2024) आणि नितीश कुमार यांची मदत घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.
‘या’ राज्यांत भाजपला फटका
देशात भाजपला पश्चिम बंगाल, उतर प्रदेश आणि महाराष्ट्रमध्ये मोठा फटका बसणार असल्याचं म्हटलं जातंय. 2019 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपने 63 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 37 जागांवर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आघाडीवर चालला आहे. तर 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. हरियाणातही (Lok Sabha Election 2024) काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. हरियाणात काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. अशात कॉँग्रेस इतर पक्षांशी बोलणी करून पुन्हा सत्तेत येणार का?, याबाबत आता वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
News Title – Lok Sabha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान
वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं
सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव
राज्यातला पहिला जल्लोष, निकालाआधीच अमोल कोल्हेंकडून अशाप्रकारे आनंद साजरा
मावळमध्ये कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर; जाणून घ्या फक्त एका क्लिकवर






