मंगेशकर कुटुंबीयांकडून मोठा सन्मान! कुमार मंगलम बिर्ला यांना ‘लता दीनानाथ पुरस्कार’!

On: April 16, 2025 3:56 PM
Kumar Mangalam Birla
---Advertisement---

Lata Mangeshkar Award l प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांना यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award) जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार संगीत, नाटक, कला, वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना देण्यात येतो. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा हा सन्मान मंगेशकर कुटुंबीयांनी परिपत्रकाच्या माध्यमातून जाहीर केला.

या वर्षी पुरस्कारप्राप्तांच्या यादीत श्रद्धा कपूर, सचिन पिळगावकर, सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टी, शरद पोंक्षे आणि प्रसिद्ध व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांचाही समावेश आहे. 24 एप्रिल रोजी विलेपार्लेतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे. (Lata Mangeshkar Award)

कुमार मंगलम बिर्ला यांचं व्यावसायिक क्षेत्रातील योगदान :

आदित्य बिर्ला समूहाचे प्रमुख असलेल्या कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांनी 1995 मध्ये वडील आदित्य विक्रम बिर्ला यांच्या निधनानंतर वयाच्या 28 व्या वर्षी समूहाची धुरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वात समूहाने औद्योगिक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला.

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे पहिले मानकरी पंतप्रधान नरेंद्र (narendra modi) मोदी होते. त्यानंतर आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. यावर्षी कुमार बिर्ला (kumar birla) यांच्यासोबत अनेक कलाकारांचा देखील गौरव होणार आहे.

Lata Mangeshkar Award l चित्रपट, रंगभूमी व संगीत क्षेत्रातील दिग्गजांचा सन्मान :

श्रद्धा कपूर यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी हा सन्मान दिला जाणार आहे. सोनाली कुलकर्णी यांना नाटक व सिनेमातल्या त्यांच्या कामगिरीसाठी गौरवण्यात येणार आहे. सचिन पिळगावकर आणि शरद पोंक्षे यांचाही या पुरस्कारामध्ये समावेश आहे.

संगीत क्षेत्रातील रीवा राठोड यांना उदयोन्मुख गायिका म्हणून तर डॉ. एन. राजम यांना त्यांच्या शास्त्रीय संगीतामधील अतुलनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षीची घोषणा पत्रकार परिषद न घेता परिपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

News Title: Lata Deenanath Mangeshkar Award 2025: Kumar Mangalam Birla Honoured Along with Shraddha Kapoor and Others

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now