Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली माझी लाडकी भिन्न योजना ही योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र अलीकडे काही माध्यमांमध्ये लाखो महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण देत सर्व लाभार्थी महिलांची चिंता दूर केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की सध्या अशा प्रकारची कोणतीही अधिकृत आकडेवारी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही. (Ladki Bahin Yojana News)
90 लाख महिलांची नावे वगळल्याची बातमी चुकीची :
लाडकी बहीण योजनेतून सुमारे 90 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या बातम्यांमुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आपले नाव योजनेतून काढले गेले आहे का, अशी भीती अनेक लाभार्थ्यांना वाटत होती.
मात्र अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आणि तथ्यहीन असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते, सरकारने अद्याप कोणतीही अंतिम यादी जाहीर केलेली नाही.
Ladki Bahin Yojana | 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करण्याची संधी :
सरकारने योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे. सध्या ही प्रक्रिया सुरू असून लाभार्थ्यांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana E-KYC)
ई-केवायसी प्रक्रियेनंतरच पात्रता निकष तपासून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे महिलांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या स्पष्टीकरणामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.






