लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी-मार्चचा हप्ता कधी येणार? महत्वाची माहिती समोर

On: March 18, 2026 5:13 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीचा लाभ न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र मिळणार? :

राज्य सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो. जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला होता, मात्र त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही.

मार्च महिना संपत येत असतानाही हप्ता न मिळाल्याने अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात 1500 रुपयांच्या ऐवजी थेट 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ladki Bahin Yojana | पैसे खात्यात नेमके कधी येणार? :

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा प्रलंबित हप्ता 15 एप्रिलपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे लाभ मिळण्यास उशीर झाला असला तरी दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याने लाभार्थींना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही योजना सुरू ठेवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. या योजनेसाठी सरकारकडून आवश्यक ती आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ई-केवायसी नसेल तर लाभ थांबू शकतो

या योजनेसाठी राज्य सरकारने ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. काही महिलांनी ई-केवायसी करताना चुकीची माहिती भरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा महिलांना माहिती दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

जर या तारखेपर्यंत माहिती दुरुस्त केली नाही किंवा लाभार्थी महिलांचा अर्ज योजनेच्या निकषात बसत नसेल, तर त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेले नाही किंवा माहितीमध्ये चुका आहेत, त्यांनी 31 मार्चपूर्वी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

News Title: Ladki Bahin Yojana Update: February and March Installments Likely Together, ₹3000 to Be Credited

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now