1500 की 2100; लाडक्या बहिणींच्या खात्यावर किती रुपये जमा होणार?

On: December 24, 2024 4:07 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आजपासून या योजनेचा सहावा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे संक्रांती आधीच लाडक्या बहिणांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. मात्र या योजनेचे 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार यासंदर्भात अनेक महिला संभ्रमात आहेत. तर आता आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊयात…

सहावा हप्ता दोन टप्प्यात वितरित होणार :

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1500 रुपये प्रतिमहा जमा होत आहे. आत्तापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जमा झाले आहेत. अशातच आजपासून या योजनेचा सहावा हप्ता देखील लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात झाली आहे.

मात्र यावेळी सहावा हप्ता हा दोन टप्प्यात लाभार्थी महिलांना मिळणार आहे. परंतु, पहिल्या टप्प्यात तब्बल 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. मात्र त्यानंतर उर्वरित महिलांना या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. तसेच या योजनेसाठी 3500 कोटी रुपयांचा निधी देखील वर्ग करण्यात आला आहे.

Ladki Bahin Yojana l सहाव्या हप्त्याची रक्कम किती?:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम नेमकी किती मिळणार असा प्रश्न राज्यातील लाभार्थी महिलांना पडला आहे. कारण महायुती सरकारने विधानसभेच्या काळात लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार डिसेंबर महिन्याचा हप्ता हा 2100 रुपये मिळण्याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.

मात्र लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच मिळणार आहे. त्यामुळे आता 2100 रुपये मिळण्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. कारण 2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

News Title – Ladki Bahin Yojana December month money received from today

महत्त्वाच्या बातम्या-

‘बंदोबस्त करणार’! मंत्री होताच नितेश राणेंनी दिला इशारा?

‘महाजन साहेब मलाही पक्षात घ्या’, ठाकरेंचा ‘हा’ बडा नेता भाजपाच्या वाटेवर?

शिवसेनेच्या नेत्यांवर पुन्हा अन्याय! मोठं कारण आलं समोर

उद्धव ठाकरे अ‍ॅक्शनमोडवर! लवकरच निवडणुकीचा धुराळा उडणार?

बीडच्या ‘आका’बद्दल आमदार सुरेश धसांचा धक्कादायक खुलासा!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now