लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज! ‘या’ दिवशी खात्यात येणार १५०० रुपये!

On: January 22, 2026 5:00 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच डिसेंबरचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याच्या (January Installment) हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी दिलासादायक अपडेट मिळाली आहे. राज्य सरकारने या हप्त्यासाठी आवश्यक निधी मंजूर केल्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या योजनेसाठी तब्बल 393.25 कोटी रुपयांच्या निधी वितरणास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वी महापालिका निवडणुका आणि मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरचा हप्ता 14 जानेवारी रोजी जमा करण्यात आला होता.

मतदानापूर्वी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होणार :

फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच पात्र महिलांच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निधीचा लाभ मुख्यतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांना दिला जाणार आहे. काही महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे रखडले होते. मात्र आता त्या प्रकरणांची पडताळणी करून अडकलेले हप्तेही वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Ladki Bahin Yojana | ई-केवायसीमधील चुका दुरुस्तीसाठी विशेष मोहीम :

राज्यात अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी सुरू असून, पात्र महिलांचा लाभ कोणत्याही कारणाने अडू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जात आहे. अनेक महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचे हप्ते थांबले होते. ही बाब लक्षात घेऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. (Ladki Bahin Yojana)

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक पात्र महिलेपर्यंत पोहोचवणे ही सरकारची प्राथमिकता आहे. तांत्रिक अडचणींमुळे कुणाचाही हप्ता थांबणार नाही, याची विशेष काळजी घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत महिलांच्या खात्यात पुन्हा 1500 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

News Title: Ladki Bahin Yojana: ₹393.25 Crore Fund Approved for January Installment, Women to Get ₹1500 Soon

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now