लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होणार? महत्वाची माहिती समोर

On: July 15, 2026 7:15 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंतर्गत जून महिन्याचा हप्ता अद्याप न मिळाल्याने लाखो महिला प्रतीक्षेत आहेत. आता या रखडलेल्या हप्त्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे कधी जमा होऊ शकतात याबाबत नवे संकेत मिळाले आहेत.

जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? :

राज्यातील सुमारे दीड कोटी महिलांना जून महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. उपलब्ध माहितीनुसार, 25 जुलै ते 29 जुलैदरम्यान पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 25 जुलैला आषाढी एकादशी आणि 29 जुलैला गुरुपौर्णिमा असल्यामुळे या शुभ दिवसांपैकी एका दिवशी निधी वितरित होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मात्र या संदर्भात राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महिलांनी अधिकृत निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतरच संबंधित रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana | दुहेरी हप्ता आणि मानधनवाढीची शक्यता :

जर काही तांत्रिक अडचणींमुळे 29 जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता वितरित झाला नाही, तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी वितरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. सामाजिक न्याय विभागाकडून निधी उपलब्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या एका समितीने केलेल्या सर्वेक्षणानंतर मासिक मानधन 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शिफारस करण्यात आली आहे. राज्य शासन या प्रस्तावावर सकारात्मक असल्याचे सांगितले जात असून, याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, योजनेचा लाभ फक्त त्या महिलांनाच मिळणार आहे ज्यांनी योजनेतील सर्व अटींचे पालन केले असून 30 एप्रिलपूर्वी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली आहे.

News Title: Ladki Bahin June Installment Update

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now