लाडक्या बहीणींना धक्का, 2100 रुपये मिळणार नाही?; मंत्री आदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य

On: March 7, 2025 8:07 AM
Ladaki Bahin Yojana government changed its mind about Rs 2100
---Advertisement---

Ladaki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ (Ladaki Bahin Yojana) योजना आर्थिक मदतीसाठी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने त्यात वाढ करून 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही.

अशातच राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात 2100 रुपये देण्याची कोणतीही घोषणा केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीतील आश्वासन फोल?

राज्यात निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली ‘लाडकी बहिण’ योजना मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरली होती. महायुतीच्या नेत्यांनी सत्तेवर आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत आधी विधानसभेत वक्तव्य केले होते. मात्र, आता सरकारने हे आश्वासन पूर्ण करण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, “तो जाहीरनामा पाच वर्षांसाठी आहे, त्यामुळे तातडीने 2100 रुपये देण्याचा निर्णय झालेला नाही.”

विरोधकांचा सरकारवर निशाणा

यावरून महायुती सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनी सरकारवर टीका करताना म्हटले की, “सरकारने निवडणुकीपूर्वी मोठी आश्वासने दिली होती, जी आता फोल ठरत आहेत.” राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मार्च महिन्यात 3000 रुपयांचा सन्मान निधी मिळणार

दरम्यान, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 7 मार्च 2025 पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. (Ladaki Bahin Yojana)

Title : Ladaki Bahin Yojana government changed its mind about Rs 2100

 

Join WhatsApp Group

Join Now