Kunal Kamra | राज्यातील विधानभवनात झालेल्या धक्कादायक हाणामारीच्या घटनेनंतर आता प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी (Kunal Kamra) महायुती सरकारवर उपरोधिक हल्ला चढवला आहे. ‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर…’ अशा उपरोधिक कवितेच्या माध्यमातून कामराने हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. (Kunal Kamra Slams Mahayuti)
कुणाल कामराने सोशल मीडियावर एक एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये आव्हाड-पडळकर यांचे कार्यकर्ते हाणामारी करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर त्याने ‘Lawbreakers’ असं कॅप्शन दिलं असून, उपहासात्मक कवितेद्वारे सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. विधानभवनासारख्या गंभीर संस्थेच्या प्रांगणात असा तमाशा सुरू असताना, विरोधकांपासून कलाकारांपर्यंत अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
कामराची कविता ठरली जिव्हारी लागणारी :
कुणाल कामराची कविता सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. ‘होंगे नंगे चारो ओर, करेंगे दंगे चारो ओर, पुलिस के पंगे चारो ओर… एक दिन मन में नथुराम, हरकतें आसाराम, हम होंगे कंगाल एक दिल’ अशा ओळींमधून त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणावर टीका केली आहे. या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांची झलकही वापरण्यात आली आहे, ज्यामुळे या टीकेला अधिक राजकीय धार मिळाली आहे.
*Lawbreakers* pic.twitter.com/L8aiwvGlPw
— Kunal Kamra (@kunalkamra88) July 17, 2025
कामराच्या या कवितेवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी त्याचे समर्थन करत ‘लोकशाहीत हेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी ‘राजकारणावर अशा प्रकारे थट्टा करणे योग्य नाही’ अशी भूमिका मांडली आहे.
विधानभवनातील हाणामारीची गंभीर दखल :
गुरुवारी संध्याकाळी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक भिडले. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांच्यात बाचाबाची सुरू झाली आणि नंतर ती हाणामारीत परिवर्तित झाली. एकमेकांच्या कॉलर पकडून मारहाण, कपडे फाडणे, अशा अशोभनीय प्रकारांनी घटनास्थळी गोंधळ उडाला. (Kunal Kamra Slams Mahayuti)
या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सीसीटीव्ही फुटेज मागवून कठोर कारवाईचे संकेत दिले. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत ‘हा प्रकार विधानभवनाच्या शिष्टाचाराचा अपमान आहे,’ असं सांगितलं.






