“मामा आणि मामीचा घटस्फोट…”, गोविंदाच्या नात्यावर भाचा कृष्णा अभिषेकची मोठी प्रतिक्रिया!

On: February 26, 2025 3:10 PM
Krushna Abhishek Reacts to Govinda-Sunita Divorce Rumors 
---Advertisement---

Govinda-Sunita Divorce | बॉलिवूड अभिनेता गोविंदा (Govinda) आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Govinda-Sunita Divorce) यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीशी गोविंदाचे अफेअर असल्यामुळे हे दोघे वेगळे होत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता या चर्चांवर गोविंदाचा भाचा आणि प्रसिद्ध अभिनेता-कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) याने प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णाने या चर्चांना अफवा म्हटलं असून, त्याने त्याच्या मामा आणि मामी यांचा घटस्फोट होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

कृष्णा अभिषेक काय म्हणाला?

सध्या सर्वत्र गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा आहे. मात्र, कृष्णा अभिषेकने या सर्व गोष्टी अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला, “हे शक्यच नाही. त्यांचा घटस्फोट होणार नाही.”

त्याने एका मुलाखतीत या विषयावर मत व्यक्त केलं. कृष्णाच्या म्हणण्यानुसार, गोविंदा आणि सुनीता यांच्यात काही वैयक्तिक मतभेद असू शकतात, पण ते इतक्या मोठ्या टप्प्यावर जातील, असं तो मानत नाही.

मॅनेजरनेही दिले स्पष्टीकरण

काही रिपोर्ट्सनुसार, सुनीताने काही महिन्यांपूर्वी गोविंदाला घटस्फोटाची नोटीस पाठवली होती. मात्र, गोविंदाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. काही रिओरतनुसार, घटस्फोटाची नोटीस पाठवली गेली असली तरी, त्यावर कोणतीही पुढील कारवाई झालेली नाही.

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा (Shashi Sinha) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं, “या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही. मी नेहमीच गोविंदासोबत असतो आणि अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सुनीताने काही मुलाखती दिल्या आहेत, मात्र काहींनी तिच्या वक्तव्यांचा विपर्यास केला आहे.”

सुनीता आणि गोविंदा राहतात वेगळे?

सुनीताने मुलाखतीत सांगितलं होतं की ती आणि गोविंदा बऱ्याच वेळा वेगळे राहतात. ती आपल्या मुलांसोबत एका फ्लॅटमध्ये राहते, तर गोविंदा समोरच्या बंगल्यात राहतो.

यासोबतच, सुनीताने म्हटलं होतं, “कोणत्याही माणसावर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. लोक सरड्यासारखे रंग बदलतात. आमच्या लग्नाला 37 वर्षं झाली आहेत, तो कुठे जाणार आहे? पूर्वी मी कुठेही जात नव्हते, पण आता परिस्थिती वेगळी आहे.” (Govinda-Sunita Divorce)

सुनीताने पुढे सांगितलं, “पूर्वी मी स्वतःला खूप सुरक्षित समजायचे, पण आता तसं वाटत नाही. 60 वर्षांनंतर लोकांचं वागणं बदलतं. गोविंदाचं वय आता 60 वर्षं झालं आहे, त्यामुळे तो काय करतो, हे मला ठाऊक नाही. मी त्याला सांगितलं आहे – ‘तू 60 वर्षांचा झालास, हट्टी होऊ नकोस!’”

गोविंदाच्या खासगी आयुष्याबद्दल गोंधळ कायम!

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात सध्या काय चाललं आहे, याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अधिकृतरीत्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असल्याचं कोणत्याही बाजूने स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या चर्चांचं पुढे काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Title : Krushna Abhishek Reacts to Govinda-Sunita Divorce Rumors 

 

Join WhatsApp Group

Join Now