कोल्हापुरात मोठा राजकीय भूकंप! ‘या’ आमदाराच्या सुनेचा, मुलाचा व पुतण्याचाही पराभव

On: December 21, 2025 1:03 PM
kolhapur Election Result
---Advertisement---

Kolhapur Municipal Election Results 2025 | महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना कोल्हापूर जिल्ह्यातून धक्कादायक राजकीय चित्र समोर आले आहे. शिरोळ तालुक्यातील आमदार अशोकराव माने यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा झटका बसला असून मतदारांनी त्यांच्या कुटुंबीयांनाच स्पष्ट नकार दिला आहे. स्थानिक राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या मानेंच्या घराणेशाहीला या निकालाने जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Ashokrao Mane Defeat)

नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकांमध्ये अशोकराव मानेंचा मुलगा, सून आणि पुतण्या तिघांचाही पराभव झाला आहे. त्यामुळे हा निकाल केवळ स्थानिक सत्ता बदलापुरता मर्यादित न राहता कोल्हापूरच्या राजकारणातील मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे. मतदारांनी घराणेशाहीपेक्षा नेतृत्व आणि कामगिरीला प्राधान्य दिल्याचा स्पष्ट संदेश दिल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शिरोळमध्ये मानेंची घराणेशाही कोसळली :

कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना शिरोळ नगरपालिकेतील निकाल सर्वाधिक चर्चेत ठरले आहेत. आमदार अशोकराव मानेंची सून सारिका अरविंद माने यांचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक पदाच्या निवडणुकीत त्यांचा मुलगा अरविंद अशोकराव माने यांनाही मतदारांनी नाकारले आहे.

इतकेच नव्हे तर मानेंच्या पुतण्यालाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालामुळे शिरोळ नगरपालिकेतील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची सत्ता संपुष्टात आली असून येथे 15 नगरसेवक आणि नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. एकूणच शिरोळमध्ये सत्ताबदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Shiroli Nagar Palika Results)

Kolhapur Municipal Election Results 2025 | कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाची सरशी, विरोधकांची पिछेहाट :

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने लक्षणीय यश मिळवले आहे. जयसिंगपूर, शिरोळ, मुरगूड आणि कुरुंदवाड या चार ठिकाणी शिंदे गटाने नगराध्यक्षपदाचा विजय मिळवला आहे. मुरगूड नगरपालिकेत मतदारांनी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीला नाकारत शिंदे गटाच्या सुहासिनीदेवी पाटील यांना स्पष्ट कौल दिला आहे. (Kolhapur Municipal Election Results 2025)

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला गडहिंग्लज आणि कागल येथे मर्यादित यश मिळाले आहे. काँग्रेसला केवळ पेठवडगाव आणि शिरोळ या दोन ठिकाणीच विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि मनसे यांना कोल्हापूर जिल्ह्यात एकाही ठिकाणी विजय मिळवता आलेला नाही. या निकालांमुळे कोल्हापूरच्या राजकारणात शिंदे गटाची ताकद वाढली असून पारंपरिक नेत्यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.

News Title : Kolhapur Municipal Election Results 2025: MLA Ashokrao Mane Suffers Major Defeat, Family Members Lose

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now