कोल्हापूरमध्ये मान आणि मतही गादीलाच! शाहू महाराजांचा दणदणीत विजय

Kolhapur Lok Sabha Result | कोल्हापूरमध्ये सुरुवातीच्या कलापासून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आघाडीवर होते. कोल्हापुरात महाविकास आघाडीने विजयाची मोहर लावली आहे. शाहू महाराज छत्रपती यांचा दणदणीत विजय झाला आहे.

कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत झाली. येथे शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा दारुण पराभव झाला आहे. शाहू महाराज यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांकडून कोल्हापुरात जोरदार जल्लोष केला जातोय. कार्यकर्ते गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त करत आहेत.

शाहू महाराजांचा दणदणीत विजय

या निकालानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”जनतेने हे दाखवून दिले की छत्रपती घराण्यावर आमचा किती विश्वास आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून सर्व तालूक्यातील लोकांनी, सर्व शहरातील लोकांनी भरघोस मतदान हे शाहू महाराजांना केले.”, असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

शाहू महाराज vs संजय मंडलिक

शाहू महाराज यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीने प्रचार करण्यात आला होता.अखेर जनतेने देखील त्यांना निवडून हे दाखवून दिलं आहे. शाहू महाराज हे कॉँग्रेसच्या तिकीटावर येथे उभे राहिले होते.

News Title- Kolhapur Lok Sabha Result Shahu Maharaj won

महत्वाच्या बातम्या-

बारामती शरद पवारांचीच! लेकीनं गड राखला, अजित पवार आता मिशा काढणार?

उमेदवाराचा EVM मशिनवर आक्षेप, रावेर मतदारसंघात खळबळ

बारामतीत सुप्रिया सुळेंचा दणदणीत विजय; सुनेत्रा वहिणींचा दारूण पराभव

इंडिया आघाडीची नितीश कुमारांना मोठी ऑफर!

सांगलीत ठाकरे आणि भाजपला धक्का; बंडखोर विशाल पाटील यांची विजयी मोहोर