‘लोकसभेतील यशामागे तुमचं अफाट कष्ट अन्..’; उद्धव ठाकरेंनी फोन करत मानले किरण मानेंचे आभार

Kiran Mane | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. या निकालात महाविकास आघाडी महायुतीवर भारी पडल्याचं दिसून आलं. महायुतीला यंदा केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवलाय. त्यात ठाकरे गटाने 9 जागांवर विजय प्राप्त केला आहे.

लोकसभा निवडणुकांचा निकाल लागताच उद्धव ठाकरे यांनी किरण माने यांना फोन कॉल करत त्यांचे आभार मानले. किरण माने हे ठाकरे गटाचे नेते तसेच या निवडणुकीतील स्टार प्रचारक होते. त्यांनी बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या होत्या.

मविआच्या विजयामध्ये माने यांचाही वाटा असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून त्यांचे आभार मानले. याबाबत किरण माने (Kiran Mane)यांनी फेसबुकवर एक पोस्ट देखील टाकली आहे.ही पोस्ट आता चर्चेत आली आहे.

किरण माने यांची पोस्ट

“फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिन्टांपुर्वी उद्धवजींचे दोन मिस्ड कॉल्स येऊन पडले होते.नंतर ‘जय महाराष्ट्र’ असा मेसेज येऊन पडला होता. मी कॉल बॅक केला… उद्धवजींनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली.”, असं किरण माने यांनी पोस्टमध्ये सांगितलं.

“किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम.” उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खुप काही बोलत होते.माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली. भाग गेला सीण केला । अवघा झाला आनंद ।। अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुकवर केली आहे.

किरण मानेंच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. किरण मानेंनी काही महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी जोरदार प्रचार केला होता.

News Title – Kiran Mane Post about uddhav thackeray

महत्त्वाच्या बातम्या-

नवरा भाजपकडून, घटस्फोटित बायको तृणमूलकडून उभी, पाहा कुणाचा झाला विजय

पवार घराण्याला स्विकारावा लागला तिसरा पराभव, पाहा तिघांची नावं

सासऱ्याच्या विरोधात उभ्या होत्या दोन सुना, अत्यंत धक्कादायक लागला निकाल

पिपाणीमुळे तुतारीला मोठा फटका!, समोर आलेले आकडे अत्यंत धक्कादायक

पराभव लागला जिव्हारी; आणखी एका भाजप नेत्याने दिला राजीनामा