पाणी प्यायल्यानंतर ‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध; दुर्लक्ष केल्यास किडनी होऊ शकते निकामी

On: February 20, 2025 1:28 PM
Kidney Failure Symptoms
---Advertisement---

Kidney Failure Symptoms | आजकाल अनेक लोक किडनीशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. किडनीचा आजार झाल्यास शरीरात काही लक्षणे दिसतात, पण कधीकधी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जेव्हा किडनीच्या आजाराची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. काही गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास किडनीचे आजार ओळखता येऊ शकतात. आज आपण किडनीच्या आजाराच्या अशाच काही लक्षणांबद्दल जाणून घेणार आहोत. जर तुमची किडनी व्यवस्थित काम करत नसेल, तर पाणी प्यायल्यानंतर काही लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. (Kidney Failure Symptoms)

पाणी प्यायल्यानंतर दिसणारी लक्षणे

१) किडनीमध्ये वेदना: जेव्हा किडनी नीट काम करत नाही, तेव्हा शरीरातील गाळण्याची प्रक्रिया (filter process) मंदावते. यामुळे पाणी किडनीतून हळूहळू मूत्राशयाकडे (bladder) जाते. अशावेळी तुम्ही पाणी पिता, तेव्हा किडनीमध्ये जास्त पाणी जमा होऊन वेदना होऊ शकतात.

२) मळमळ आणि उलटी: किडनीचा त्रास झाल्यास मळमळ आणि उलटी ही सामान्य लक्षणे आहेत. जर किडनीचा आजार वाढला असेल, तर पाणी प्यायल्यानंतर लगेच मळमळ आणि उलटी होऊ शकते. त्यामुळे, असे काही होत असल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३) चक्कर येणे: ज्या लोकांची किडनी खूप आधीपासून खराब असेल किंवा नीट काम करत नसेल, अशा लोकांना अनेकदा चक्कर येते किंवा डोके गरगरते. विशेषतः जास्त पाणी प्यायल्यावर किडनीवर दाब वाढतो आणि त्यामुळे डोके गरगरू शकते किंवा दुखू शकते.

४) लगेच लघवी लागणे: पाणी प्यायल्यानंतर लगेच लघवीला जावे लागत असेल, तर हा किडनी खराब होण्याचा संकेत असू शकतो. मात्र, हिवाळ्यात किंवा एसीमध्ये (AC) जास्त वेळ राहिल्याने देखील पाणी प्यायल्यावर लगेच लघवी लागू शकते. तरीही, खबरदारी म्हणून एकदा किडनीची तपासणी करणे योग्य राहील. (Kidney Failure Symptoms)

५) अचानक थकवा आणि कमजोरी: किडनी खराब झाल्यामुळे बहुतेक लोकांना दिवसभर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पण, पाणी प्यायल्यानंतर लगेचच अचानक थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर हे किडनी गंभीररित्या खराब झाल्याचे लक्षण असू शकते. अशावेळी, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Title : Kidney Failure Symptoms  

 

Join WhatsApp Group

Join Now