Ketan Agarwal Death | पुण्यातील (Pune) तरुण उद्योजक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी (Ketan Agrawal Case) लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासातून आता आणखी एक अत्यंत क्रूर आणि काळजाचा थरकाप उडवणारा खुलासा समोर आला आहे. केतनला ४०० फूट खोल दरीत ढकलल्यानंतर मुख्य आरोपी सिया गोयल हिने तात्काळ आरडाओरडा न करता, तब्बल १५ मिनिटे अत्यंत थंड डोक्याने एकाच जागी शांत बसून राहणे पसंत केले होते.
पोलिसांच्या चौकशीत समोर आलेला हा धक्कादायक घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे:
प्रियकर चेतन सुरक्षित पळण्याची पाहत होती वाट
तपासातील माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला खोल दरीत ढकलून दिल्यानंतर सियाने लगेच मदतीसाठी कोणालाही बोलावले नाही. त्यामागे तिचा आणि प्रियकर चेतन चौधरी याचा एक मोठा कट होता:
१५ मिनिटांचा भयानक शांतता: केतनला कड्यावरून ढकलल्यानंतर चेतनने गडावरून तातडीने पळ काढला. जोपर्यंत चेतन किल्ल्याच्या परिसरातून सुरक्षितपणे बाहेर पडत नाही आणि तिला तसा संकेत मिळत नाही, तोपर्यंत सिया एकाच ठिकाणी शांत बसून होती.
कोणी पाहत नसल्याची केली खात्री: या १५ मिनिटांच्या काळात आपल्याला आजूबाजूला कोणी पाहत तर नाही ना, याची तिने खात्री करून घेतली. चेतन सुरक्षितपणे पसार झाल्याचे स्पष्ट झाल्यावरच तिने आपल्या नियोजित नाटकाला सुरुवात केली.
मदतीऐवजी सर्वात आधी आईला केला फोन
ज्यावेळी केतन खाली दरीत गंभीर जखमी अवस्थेत होता आणि त्याला तातडीच्या वैद्यकीय मदतीची गरज होती, तेव्हा सिया मदतीसाठी धावण्याऐवजी फोनवर बोलण्यात व्यस्त होती.
आईला दिली माहिती: सियाने सर्वात आधी आपल्या आईला फोन लावला आणि केतन दरीत कोसळल्याचे सांगितले.
आईकडून अग्रवाल कुटुंबाला निरोप: सियाच्या आईनेच त्यानंतर केतनचे वडील विशाल अग्रवाल आणि इतर नातेवाईकांना केतन लोहगडावरून खाली पडल्याची माहिती दिली. केतन दरीत आयुष्य आणि मृत्यूची लढाई लढत असताना, सिया मात्र वर राहून नातेवाईकांशी फोनवर बोलत वेळ काढत होती.
…आणि त्यानंतर सुरू झाला आक्रोशाचा बनाव
नातेवाईकांना फोन करून झाल्यानंतर सियाने किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी “बचाओ-बचाओ, माझा होणारा नवरा खाली पडला” म्हणून जोरात ओरडण्यास आणि रडण्यास सुरुवात केली.
तिचा हा खोटा आक्रोश आणि नाटक इतके हुबेहूब होते की, गडावर उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांना सुरुवातीला ती खरीच बोलत असल्याचा विश्वास पटला. त्यानंतर तिथल्या काही पर्यटकांनी स्थानिक पोलीस आणि रेस्क्यू टीमशी (बचावकार्य) संपर्क साधला. सियाने मुद्दामहून केलेल्या या विलंबामुळे (Delay) बचावकार्याला प्रचंड उशीर झाला आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे केतनचा मृत्यू झाला.
सियाच्या आई-वडिलांचीही झाली चौकशी
या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी पोलिसांनी आता केवळ सिया आणि चेतनच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबाभोवतीही चौकशीचा पाश आवळला आहे. पोलिसांनी काल सियाच्या आई आणि वडिलांचीही कसून चौकशी केली असून त्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. सियाने हत्येनंतर सर्वात आधी आईला फोन केल्यामुळे, या संपूर्ण कटाची माहिती तिच्या कुटुंबाला आधीपासून होती का, या दृष्टीने पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
या खटल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने आधीच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा निर्णय घेतला असून, सरकारची बाजू ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. उज्ज्वल निकम मांडणार आहेत.
News Title: ketan agarwal death case Siya First called her mother Lohagad Fort crime






