‘या’ अभिनेत्रीचा भीषण अपघात, रक्ताळलेले फोटो पोस्ट करत दिली माहिती!

On: November 18, 2024 7:00 PM
kashmira shah
---Advertisement---

Kashmira Shah | बाॅलिवूड अभिनेत्री कश्मीरा शाह ही कृष्णा अभिषेकची पत्नी आहे. कश्मीरा शाह हीचा बाहेरच्या देशात भीषण आपाघात झाल्याचं समोर आलं आहे. कश्मीरा लाॅस एन्जिल्समध्ये असून आपल्या आपघाताबद्दल स्वतः माहिती दिली आहे. या वेळेस तिने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तिच्या कुटुंबाला मिस करत असल्याचं  म्हटलं आहे. कश्मीराने आपघाताबद्दल दिलेल्या माहितीनंतर बाॅलिवूडमधील सेलिब्रिटींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

कश्मीरासोबत काय घडलं?

कश्मीरा शाहचा (Kashmira Shah) नुकताच अपघात झाला. हा अपघात खूप मोठा होता, ज्यामध्ये अभिनेत्री गंभीर जखमी झाली होती. आता अभिनेत्रीने अपघातानंतरचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात दुखापत साफ करताना अनेक नॅपकिन रक्ताने माखलेले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कश्मीरा शाह (Kashmira Shah) ही सध्या लॉस एन्जिल्समध्ये आहे. तर तिचे दोन्ही मुलं रेयान आणि कृषांग हे कृष्णा अभिषेकसोबत मुंबईला परतले. त्यानंतर त्या दोघांनी अनेक रील्सही शेअर केले होते. पण आता कश्मीरानं शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे.

पोस्टमध्ये काय म्हणाली?

कश्मीराने पोस्ट करत म्हटलं की, ‘देवा, मला वाचवण्यासाठी तुझे आभार. खूप भयानक घटना घडली. काही मोठं होणार होतं, पण नशिबानं थोडक्यात झालं. आशा आहे की दुखापतीचे निशाण राहणार नाही. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येतेय”, असं मत व्यक्त करत तिने कृष्णा अभिषेकसोबत दोन्ही मुलांची नावं देखील लिहिली आहेत. कश्मीराच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तिच्यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसेच राजेश खट्टरनं विचारलं की ‘कॅश काय झालं तुला? आशा आहे की सगळं काही चांगलं आहे, ‘कृष्णा अभिषेकनं कमेंट केली की ‘देवाच्या कृपेनं तू आता ठीक आहेस’.

News Title : kashmira shah shares photo of her terrible road accident

महत्त्वाच्या बातम्या-

राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!

रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं

चंद्रकांत पाटलांचं कोथरूडकरांना आवाहन, म्हणाले…

नवऱ्याकडून छळ झाला सांगताना भाजप उमेदवाराला रडू कोसळले?

मुख्यमंत्र्यांनी 74 कोटीचा घोटाळा केला; कोणी केला आरोप?

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now